भारताला नवी दिशा देणारे महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सचिन बडदे



श्रीरामपूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही भारताला एक वेगळी दिशा देणारे भारत प्रगतीच्या , समतेच्या दिशेने नेणारे महामानव म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे सचिन बडदे यांनी केले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या त्यांच्या कार्याची आठवण यावेळेस करण्यात आली. यावेळी सचिन बडदे यांनी सांगितले की, आज सर्व भारत आणि महाराष्ट्रात फक्त न्याय कोण देऊ शकता तर संविधान अशीच भावना सर्वत्र दिसत आहे बाकीचे सर्व घटक हे लोकशाही संपवण्यासाठीच काम करत आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधानाचा समतेचा मंत्र दिला त्यावरच सर्वांचा विश्वास टिकून आहे हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण भारतात देन आहे.

यावेळी शिवसेनेचे नेते सचिन बडदे, बेलापूर शहर प्रमुख लखन भगत, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख रामा  अग्रवाल ,वाहतूक सेना शहर संघटक यासीन सय्यद ,शिवअंगणवाडी उत्तर नगर जिल्हा प्रमुख सौं शारदा आप्पासाहेब कदम ताई, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार , शांताबाई सुतार , सुलतान रज्जाक शेख , सौं.सुजाता पंकज माने ताई, रोहित भोसले ,राहुल रणधीर ,किशोर फासगे, रमेश घुले, सनी रणदिवे ,कर्मराज कसबे ,गोरख रणदिवे, गणेश रणदिवे,आकाश रणदिवे ,विजय भोसले ,अजय भोसले, मयूर पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक भीमसैनिक उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post