भिक्षेकऱ्यांसाठी सरसावले पोलीस अधिकारी
साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मार्च 2020
नेवासा|दादा दरंदले|नेवासा तालुक्यातील सोनई,घोडेगाव व परिसरात कोरोनारोगाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यू सुरू असून कर्फ्यूमुळे नागरिकांनी कालच आजसाठी आवश्यक असणाऱ्या सामानांची खरेदी केली. त्यामुळे आज कोणीच रस्त्यावर दिसत नव्हतं. असं असलं तरी फूटपाथवर, मंदिर-मशिदीच्या बाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे तसेच नगर औरंगाबाद रोड वर फिरणारे भिक्षुकरांचे मात्र हाल झाले. कुटुंब नसलेल्या या निराधारांच्या मदतीसाठी कोणीच नव्हते. ऐरवी तेथे ये-जा करणाऱ्यांकडून भिकाऱ्यांना खायला अन्न मिळतं. मात्र आज रस्त्यांवर माणसंच नसल्याने त्यांना खायला अन्नही मिळाले नव्हते. अशावेळी सोनई पोलिस स्टेशनचे स.पो.नि.जनार्दन सोनवणे व त्यांचे पोलीस सहकारी किरण गायकवाड,दत्तात्रय गावडे,शिवाजी माने, विठ्ठल थोरात,बाबा वाघमोडे,सोमनाथ झांबरे आदी पोलिसांनी पुढाकार घेत या भिकाऱ्यांना अन्न उपलब्ध करुन दिलं आहे.
या पोलिसांनी रस्त्यांवरील विविध ठिकाणी बसलेल्या या भिक्षेकऱ्यांना खाण्याचे पदार्थ नेऊन दिले. संपूर्ण राज्यात संचारबंदी असला तरी पोलीस भूक-तहान भागून आपली रक्षा करीत आहेत. बंदच्या काळात अनेकांकडे वर्फ फ्रॉम होमची सोय आहे. मात्र पोलिसांनी विविध पर्यायांचा अवलंब करीत विविध ठिकाणी तैनात राहावे लागते. आपण सुरक्षित राहावे यासाठी ते प्राणाची बाजी लावतात. आज संचारबंदी यशस्वी व्हावी, यासाठी झटणाऱ्या आणि निराधारांचा आधार होणाऱ्या पोलिसांना सलाम अशीच भावना व्यक्त होत आहे.