बाबासाहेब यांनी सांगितलेला न्याय, समता व बंधुता या मार्गाचा अवलंब करून समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डुंगरवाल यांनी केले. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला समाजात प्रतिष्ठेने जगण्यासाठी तरतूद केली.त्यामुळेच आज प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना मानाने जगत आहे असे मत आप चे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांनी व्यक्त केले.
यावेळी मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे ,प्रवक्ते एडवोकेट प्रवीण जमदाडे,भरत डेंगळे, श्रीधर कराळे, डॉ.सचिन थोरात, डॉ.प्रवीण राठोड, सचिन जाधव ,प्रशांत बागुल, सोमनाथ अभंग, भैरव शेठ मोरे ,सलीम शेख, एडवोकेट दिनेश यादव,बी म. पवार, प्रवीण लगडे, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.