हिंदू मुलीच्या पीडित कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाकडून ५१ हजाराची मदत


श्रीरामपूर : जिहादी मानसिकतेच्या लव जिहादला व धर्मांतराच्या दबावाला शेवगाव येथे बळी पडलेल्या हिंदू मुलीच्या पीडित कुटुंबाला राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शिवसेना नेते सागर भैय्या बेग यांनी एक्कावन्न हजाराची आर्थिक मदत श्रीरामपूर येथे त्यांच्या कार्यालयात सुपूर्द करून हिंदूंवर अत्याचार सहन करणार नाहीच पण अत्याचार पीडित हिंदूंच्या मागे आपण भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले.

            सकल हिंदू समाजाच्यावतीने शेवगाव येथे सोहेल शेख या जिहादी मानसिकेतेच्या युवकाने अल्पवयीन हिंदू मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणून,वडिलांना संपवण्याची धमकी दिली सततच्या त्रासाला कंटाळून त्या अल्पवयीन हिंदू मुलीने आत्महत्या करून त्या त्रासापासून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी व जिहादी आरोपीस कठोरातील कठोर शासन मिळावे म्हणून शेवगाव येथे सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी आपल्या भाषणातून धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी पीडित मुलीच्या पालकांना आर्थिक मदत देऊन मदतीचा हात द्यावा म्हणून भर सभेत राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली व पीडितेच्या कुटुंबाला प्रत्येक संघटनानी आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन सागर बेग यांनी केले. त्यानुसार श्रीरामपूर येथे पीडित मुलीच्या वडिलांच्या हातात एक्कावन्न हजाराचा धनादेश देऊन आपला शब्द सागर बेग यांनी पूर्ण केला.

          राष्ट्रीय श्रीराम संघ ही संघटना नसून एक मोठे हिंदू कुटुंब आहे कुटुंबातील कोणावरही अन्याय झाला तर संघातील प्रत्येकाने त्याचा निपटारा केला पाहिजे जिहादी मानसिकतेच्या कोणत्याही धर्मांध व्यक्तीची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी दहशत भविष्यात आपल्याला राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून उभी करायची असल्याचे त्यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post