सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून मस्जिदीवरील लावलेले भोंगे त्वरीत काढून मौलाना व कमिटीवर गुन्हे दाखल करा ; 'मनसे'चे पोलीस प्रशासनाला निवेदन


श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम लोक मस्जिदींवर विनापरवाना भोंगे लावून कर्कश आवाजाने अजान करतात. सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे उल्लंघन करून मस्जिदीवर लावण्यात आलेले भोंगे त्वरीत काढून संबंधित मौलाना व संचालक कमिटीवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी 'मनसे'चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्यासह मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक श्री गवळी तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री थोरात यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले, शुक्रवारी आवाजाचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात असते. दिवसभरही मोठा आवाज चालू असतो. यामुळे मस्जिदीच्या आजुबाजुला व परिसरात राहणार्‍या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे भोंग्याच्या आवाजाची क्षमता (डेसीबल) शासनाने ठरवुन दिलेल्या नियमापेक्षा जास्त प्रमाणात असते. यामुळे ध्वनीप्रदुषण नियमाचे उल्लंघन दिवसातून ५ वेळेस होत असते, असे असतांना पोलीस प्रशासन कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही. या आवाजामुळे अनेक वृद्ध व लहान मुले, रुग्णांना मानसिक व शारिरिक त्रास होतो. 

एखद्या व्यक्तीने या विषयी तक्रार केली तर त्याला दमदाटी करण्यात येते. आता चक्क मस्जिदीवरी भोंग्यांसाठी कोणी तक्रार केली असता हे समाज त्यांच्या महिलांना पुढे करतात. व त्यांच्यावर विनयभंगा सारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील देतात, असे शिंदे म्हणाले. मुस्लीमबहुल वस्तीत जर हिंदुंनी मंदिरात पुजा-अर्चा केली आणि त्यावेळेस थोडासा जरी आवाज आला, मंदिरातील पुजा-अर्चा करणार्‍या पुजारींना व तेथील भाविकांना दमदाटी करुन लगेचच आवाज बंद करण्यास सांगतात. त्यावेळेस मुस्लिम समाजाला याचे भान राहत नाही का ? दिवसातून ५ -५ वेळेस अजान करुन देशातील बहुसंख्य हिंदुंना त्रास होत नसेल का ? याची जाणीव देखील या मुस्लिम समाजाला झाली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. 

अनेक राज्यातील लोकांनी हायकोर्ट व सुप्रिम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. तर हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाने या भोंग्याविरोधात निकाल देऊन सांगितले की, मस्जिदीवर भोंगे लावून अजान करण्यास यापुढे मनाई आहे. तुमची प्रार्थना या तुमच्या मस्जिदीमध्ये तुम्ही करु शकतात. परंतु, मस्जिदीवर भोंगे लावून मोठ मोठ्या आवाजात आरडा-ओरडा करुन ध्वनी प्रदुषण व नागरीकांना त्रास होईल यासाठी लाऊडस्पिकर भोंगेंवर बंदी घातलेली आहे.असे असताना महाराष्ट्र राज्यामध्ये सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन होत नाही.

श्रीरामपूर शहर व ग्रामीण मधील मस्जिदीवरी भोंगे त्वरीत हटविण्यात यावे. जर एकादी मस्जिद वरील भोंगे न उतरविले गेल्यास किंवा कमी आवाजात (डेसीबल) मध्ये आवाज न झाल्यास पोलीस प्रशासनाने दखल घेऊन सदर मस्जिदेवरील संचालक मंडळ, तेथील मौलाना यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, डॉ. संजय नवथर संजय नवथर, प्रविण (आबा) रोकडे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे शहराध्यक्ष, गणेश दिवसे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, विशाल शिरसाठ जिल्हा सचिव मनविसे, विकी राऊ तालुकाध्यक्ष म.न.वि.से राहुल बारसे, भास्कर सरोदे, निलेश सोनवणे, दीपक सोनवणे, संदीप विशंभर, अमोल साबणे, दर्शन शर्मा, गणेश राऊत, अमोल ढाकणे, श्रीराम थोरात, नितीन खरे, ज्ञानेश्वर काळे, राहुल शिंदे, किशोर वाडीले, मच्छिंद्र हिंगमिरे, विपुल जखवा डे, मारुती शिंदे, बाबजी शिंदे, मनोज शिंदे, प्रकाश शिंदे,विक्रांत शिंदे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post