आ. कानडेनां हिंदूंच्या भावना दुखावल्याचे परिणाम भोगावे लागतील; प्रकाश चित्ते


साईकिरण टाइम्स | ८ फेब्रुवारी २०२१

श्रीरामपूर | अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणाऱ्या भक्तांना खंडणीखोर म्हणणाऱ्या लहू कानडेनां हिंदूंनी सुद्धा मते देवून आमदार केलेले आहे. केवळ अल्पसंख्यांकांच्या मतावर ते आमदार झालेले नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. आमदार लहू कानडे यांचे हे वक्तव्य म्हणजे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर तालुक्याच्या पारंपारिक व ग्रामीण संस्कृतीवर त्यांनी केलेला हा विषारी हल्ला आहे. आ. लहू कानडे यांचा हा हल्ला हिंदू कदापिही सहन करणार नाही. आमदार लहू कानडेनां हिंदूंच्या भावना दुखावल्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला आहे.

              प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चित्ते यांनी म्हंटले कि, हिंदूंचा ४९२ वर्षाच्या रक्तरंजित संघर्षानंतर श्रीरामजन्मभूमीच्या जागी भव्य श्रीराम मंदिर उभे राहत असून हे राष्ट्र मंदिर उभारणीच्या कामात सकल हिंदू समाज या कार्यात उस्फूर्तपणे योगदान देत आहे. या कार्यात काम करणाऱ्या  रामभक्तांची आमदारांनी खंडणीखोर म्हणून हेटाळणी करणे अत्यंत चुकीचे आहे.  श्रीरामपूर तालुक्यात मंदीर निर्माणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जमला असून साधारणपणे पंचवीस हजार कुटुंबापर्यंत हे राम भक्त पोहोचलेले आहेत. हा निधी देणाऱ्या या २५ हजार  कुटुंबांचा आमदारांनी  अपमान केला आहे.

         श्रीरामपूर सारख्या संस्कृती प्रधान असलेल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्रोही व एल्गार परिषदेच्या विचारांचा अजेंडा श्रीरामपूर तालुक्यात राबवीत असुन श्रीरामपूर तालुक्याला लहू कानडेनीं सामाजिक विभागणीची प्रयोगशाळा बनविले आहे. हे उद्योगी आमदार श्रीरामपूर तालुक्याचा सामाजिक पोत बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा लहु कानडेंचा श्रीरामपूर तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर हल्ला असून हा हल्ला श्रीरामपूरतील संस्कृती प्रधान जनता कधीही सहन करणार नाही.

         श्रीरामपूर तालुक्यात रात्री वीजपुरवठ्याच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे बिबट्याची भीती असतानासुद्धा शेतकऱ्यांना रात्रीचे शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. शेतीच्या वीजेपासून ते शेतीमाला विक्रीपर्यंत अत्यंत गंभीर समस्या असून शेतकरी या समस्यांना  तोंड देत आहे. या समस्यांवर उत्तर शोधण्याचा ऐवजी हे आमदार हास्यकल्लोळाचे कविसंमेलने भरवीत आहेत. हा विरोधाभास असून ही एक सामाजिक विकृती आहे अशा विद्रोही, उद्योगी आणि हिंदू विरोधी आमदारापेक्षा रबर स्टॅम्प, मुके व निष्क्रिय म्हणविले जाणारे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे कैकपटीने चांगले होते. त्यांनी या श्रीरामपूरचा सामाजिक बदलण्याचा कधीही प्रयत्न केला नाही असेही चित्ते यांनी म्हटले आहे .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post