वीज कनेक्शन देण्यासाठी लाच मागणाऱ्या 'महावितरण'च्या कर्मचाऱ्यास 'एसीबी'ने रंगेहाथ पकडले


साईकिरण टाइम्स | ९ फेब्रुवारी २०२१

राहाता ( अहमदनगर ) घरगुती विद्युत जोडणी देण्यासाठी ४ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महावितरणच्या सहाय्यक तंत्रज्ञास हॉटेल साई छत्र, लोणी (ता. राहाता ) येथे सोमवारी ( दि.८) रंगेहाथ पकडले.

             नवनाथ नामदेव निर्मल, वय  ४३, धंदा- सहाय्यक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) वर्ग - ४ म.रा.वि.वि.कंपनी, लोणी- २ ता.राहता. ( रा. अस्तगाव रोड, पिंप्री निर्मल, ता. राहाता, जि. अहमदनगर ) यांस एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे आडगाव खुर्द, ता. राहाता येथील राहते घरी विद्युत जोडणी घेणेकरिता वडिलांचे नावे कोटेशन भरले होते. विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवून देणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ४ हजार ५० रुपयाची मागणी केली. दरम्यान, लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपीने पंचासमक्ष ४ हजार ५०० रुपये लाचेची  मागणी केली. ही रक्कम लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष, हॉटेल साई छत्र, लोणी ता. राहाता येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post