Shrirampur : वडाळा महादेव परीसरातील गोरगरीब नागरीक मदतीपासुन वंचित


साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
वडाळा महादेव|राजेंद्र देसाई| श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अनेक कुंटुब निराधार भुमिहिन असुन मदतीपासुन वंचित आहेत. 

          सध्या राज्यात करोना महामारी आजाराने थैमान घातले असुन परीसरात संचारबंदी लागु आहे परिसरातील आठवडे बाजार बंद आहे रोजगार नसल्याने जवळपासचा पैसा    सपंला आहे. अशा अनेक अडचणी सध्या उद्भवल्या आहेत शासनाकडून फक्त तांदूळ देण्यात आले आहे  तरी गोरगरीब जनतेला घरगुती जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे अशी मागणी गोरगरीब बांधवामधुन होत आहे . 

       आजपर्यक्त आमच्या कडे लोकसेवक तसेच लोकप्रतीनीधी  कुणीही ढुकुन पाहण्यास आले नाही तरी यांच्या प्रती ग्रामस्था मधुन तिरस्कारांची भावना निर्माण होत आहे  तरी लवकारात लवकर आम्हांला किराणा तसेच जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करावे अशी मागणी वडाळा महादेव गावठाण परीसर गोरगरीब ग्रामस्थ तसेच राऊत वस्ती अशोकनगर फाटा अचान क नगर लक्ष्मीनगर वाघ वस्ती परीसर खडी क्रेशर परीसर कसार वस्ती  परीसर अशा गोरगरीब नागरीकांनी केली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post