साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचं राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने ट्विटर हॅण्डल वरून अनफॉलो केल्याचे दिसत आहे. अवघ्या 19 दिवसातच मोदींना अनफॉलो केल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे. व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आले होते.
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या 19 दिवसातच व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केले आहे.