Songaon: महावितरणाची ट्विटरवर किरण कडु यांनी तक्रार नोदविताच अधिकारी उपस्थित


साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 एप्रिल 2020
सात्रळ | बाबासाहेब वाकचौरे  |महावितरणाच्या कारभाराला तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाला सात्रळसह परिसरात पंचक्रोशीतील ग्रामस्थ हतबल झाले आहेत. तसेच मोठया स्तरावर तक्रारी करूनही वीज ग्राहकांना व शेतकरी वर्गाला जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याचा अनुचित प्रकार सात्रळ रामपुर रोड लगत कडु पाटील वस्ती येथे घडला. दरम्यान, महावितरणाची ट्विटरवर किरण कडु यांनी तक्रार नोदविताच अधिकारी उपस्थित झाले. 

     
     येथील कडु पाटील वस्ती वीज रोहित्र गेली दोन दिवसापासून बंद होते. येथील ग्रामस्थांनी दोन ते तिन दिवस विना विजेचे अंधारात काढले.तसेच पिण्याचे पाणी तसेच जनावरां साठी लागणारे पाणी अक्षरशःग्रामस्थांनी तिन ते चार किमी पायी पिठ करून पाणी  आणण्यास भाग पडले. सात्रळ सब स्टेशन चे अधिकारी  संतोष जी.सुर्वे यांचे कडे वीज रोहित्राची दुरूस्ती साठी गेली चार दिवसापासून येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ पाठपुरावा करत होते. परंतु शेतकरी वर्गाच्या या हाकेला त्यांनी रिपोर्ट न करता उडवाउडवीचे उत्तर देऊन टाळाटाळ केली.


       शेवटी शेतकरी हवालदिल होऊन स्वतः स्वखर्चाने वीज रोहित्रा साठी लागणारे साहित्य पदरमोड करत खाजगी वायरमन मार्फत दुरूस्ती करण्यात आली व रोहित्र दुरुस्त करण्यात आले. परंतु हे कृत्य महावितरणाचे अधिकारी वर्गाला रूचले नाही. येथील कर्मचारी चव्हाण सोमनाथ यांना शेतकरी वर्गाला दमबाजीची भाषा करत आमची तक्रार करता काय? व  येथील शेतकरी यांचे कनेक्शन चे विनाकारण मोबाईल  फोटो काढून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, स्थानिक शेतकऱ्यांनी इतर समस्यांवर प्रश्न  विचारले असता, MSEDCL ने इतर कामासाठी ठेकेदार नेमलेला असून ते वेळेवर काम करत नाही असे सांगितले, व मला आमचे सात्रळ सबस्टेशन अधिकारी यांनी फोटो काढण्यास सांगितले आहे असे उत्तर दिले. या सर्व प्रकरणाला कंटाळून स्थानिक ग्रामस्थ महाविरणाच्या अधिकाऱ्यांच्या अरेरावी विरोधात सात्रळ ग्रामपंचायत समोर उपोषणस बसण्याच्या तयारीत आहेत. या विषयावर ना. प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयास संपर्क केला असता सातरळ येथे या विषयावर दोन दिवसात बैठक घेणार असल्याचे कळविले.

ट्विटरवर किरण कडु यांनी ट्विट करताच  ना. प्राजक्तदादा तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे त्वरित रिप्लाय दिला, त्यामुळे महावितरणचे अधिकारी सात्रळ रामपुर रोडवर कडुपाटील वस्ती नजिक विज रोहित्रावर हजर झाले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post