जलसंधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन महत्वाचे -डॉ.राजेंद्र सिंह
नगरमध्ये विभागीय जलसाक्षरता कार्यशाळा
दि. 27 जानेवारी 2020
अहमदनगर |साईकिरण टाइम्स ब्युरो |पृथ्वीचे तापमान वाढत आहे,त्यामुळे केवळ वायूंचा अभ्यास करण्यात वेळ वाया घातला जात आहे.तपमान वाढ हे केवळ वातारणाततील वायूंशी नव्हे तर माती,पाणी,वृक्ष यांचाशी सुद्धा संबंधित आहे.पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे.केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले.
नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र यशदा व जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि.27 जानेवारी रोजी झालेल्या विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ राजेंद्र सिंह बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.
जलसाक्षरता केंद्राचे संचालक आंनद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे,जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे निमंत्रक तथा उपजिल्हाधिकारी रोहियो उदय किसवे व सदस्य सचिव तथा मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख,जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी,जलनायक किशोर धारिया,जलनायक विनोद बोधनकर,किशोर देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले,पाणी नसल्यामुळे माणसांचे विस्थापन होत आहे.हे होणारे विस्थापन आपण थांबवू शकतो.एकट्या महाराष्ट्रात देशातील एकूण पाणी साठ्यापैकी 43 टक्के पाणी साठा आहे.परंतु उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन न झाल्याने जल संकट निर्माण झाले आहे.पाण्याबाबद नंबर एक आलेला महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
पाणी ही इमरजेंसी नव्हे तर अर्जेंसी समजून काम करण्याची गरज आहे.जलसक्षरता केंद्र सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे.माणूस प्रकृती पासून दूर गेलेला आहे.पृथ्वीचे तापमान वाढत आहे,त्यामुळे केवळ वायूंचा अभ्यास करण्यात वेळ वाया घातला जात आहे.
तपमान वाढ हे केवळ वातारणाततील वायूंशी नव्हे तर माती,पाणी,वृक्ष यांचाशी सुद्धा संबंधित आहे.पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे.केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.आपण शास्र व गणिती आकडे मोडीला महत्व देतो परंतु शास्राची सांगड संवेदनेशी घालण्याची आवश्यकता आहे.पाणी हेच जीवन आणि जल पुनर्भरण यासाठीच काम करावे.पावसाच्या चक्राला पिकांच्या चक्राशी जोडण्याची गरज असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले,पाण्याची समस्या ही अत्यन्त गंभीर समस्या आहे.केवळ जल उपचार करून चालणार नाही तर त्याशी निगडित माती,वृक्ष यांचाही विचार करावा लागणार आहे.रासायनिक खते व औषधांचा अतिरेकी वापर झाल्याने जमिनीचा वरचा सुपीक थर नष्ट होत आहे. त्यामुळे जल संधारणा बरोबरच मृदा,पाणी आणि वृक्ष संरक्षण करणे गरजेचे आहे.यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.पाणी ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नव्हे सार्वजनिक संपत्ती आहे, त्यावर सर्वांचा हक्क आहे.सर्वांनी संवेदनशीलता दाखवली तर आलेल्या जल संकटातून आपण बाहेर पडू शकू असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे यांनी प्रास्ताविक केले. संचालक आनंद पुसावळे यांनी जल साक्षरता केंद्राची निवड प्रक्रिया व सद्य स्थिती यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यशाळेत जळगाव येथील जलदूत चंद्रकांत इंगळे यांनी आम्ही होऊ जलसाक्षर-मात करू दुष्काळावर यावरील पथनाट्य व गीते सादर केली. भूवैज्ञानिक डॉ नागरगोजे यांचे अहमदनगर जिल्ह्याची भू रचना व नद्या,जलनायक रमाकांत बापू कुलकर्णी व मंगल बिटके यांनी पाण्याचा ताळेबंद,राज्य जल प्राधिकरणाचे किशोर देशमुख यांनी महाराष्ट्र भू जल अधिनियम-2009,जलप्रेमी सुखदेव फुलारी यांनी पाणी वापर संस्थाचा पाण्याचा ताळमेळ,राजेंद्र सांबरे यांनी नैसर्गिक शेती-कमी पाण्याची हमी,डॉ.वने यांनी लाभक्षेत्रातील पाणी व्यवस्थापन,जलनायक विनोद बोधनकर यांनी प्लास्टिक प्रदूषण तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जल व्यवस्थान या विषयावर तर उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे ,उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी ही मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी, जलनायक, जलप्रेमी, जलदूत व जलकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.पद्मसिंह तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.
मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आभार मानले.
Tags
ताज्या घडामोडी
छान माहिती
ReplyDelete