माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स प्रगतीनगर येथे नुकताच विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथ विधी समारंभ अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या व अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी श्री.मिटके बोलत होते.
प्रारंभी लेझिम पथकाच्या तालबद्ध, लयबद्ध सादरीकरणाने मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नव्याने निवड झालेले चार हाउसचे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, स्पोर्ट कॅप्टन, हेड बॉय, हेड गर्ल व क्लास मॉनिटर यांना मान्यवरांच्या हस्ते ब्याजेस, स्याश व फ्लॅग प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांना शालेय शिस्त, वक्तशीरपणा व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. स्कूल मधील छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी, भगतसिंग व सावरकर हाऊस मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना संदीप मिटके यांनी विद्यार्थी दशेतील स्वतःचे अनुभव सांगून मी एक सामान्य विद्यार्थी होतो पण केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर या पदापर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला अशोक उद्योग समूहाचे संस्थापक भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल चे छत्र लाभले आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सौ. मुरकुटे यांनी निवड झालेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोकचे संचालक तथा शैक्षणिक ट्रस्टचे सचिव विरेश गलांडे, संचालक रामभाऊ कासार, अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख, शिक्षक पालक संघाचे सदस्य विकास तेलतुंबडे , अजित गायकवाड, सुरेश बुऱ्हाडे, संगीता लगे, जयश्री बांडे, श्रुती वाघ, कोमल साळुंखे, शितल देसाई, स्नेहा जगताप, विद्या काळे व शिक्षक श्रीमती कविता राजुळे, गणेश हळणोर, सागर कोकणे, ऋषिकेश नवले, प्रतिभा तागड, मोनिका गोंडे, मधुरा कुंदे, प्रियंका पवार, कोळसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संपत देसाई यांनी केले तर मोनिका हिरे यांनी अतिथी परिचय करुन दिला. अनिता शिंदे यांनी आभार मानले.