13 फेब्रुवारीला अहमदनगरला रोजगार मेळावा

13 फेब्रुवारीला अहमदनगरला रोजगार मेळावा

साईकिरण टाइम्स ब्युरो |अहमदनगर दि.7- पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता रावसाहेब पटवर्धन स्‍मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर, अहमदनगर  येथे आयोजित  करण्‍यात आलेला आहे.  या मेळाव्‍यात  अहमदनगर एम आय डी सी व जिल्‍हयातील विविध ठिकाणच्‍या  नामांकित कंपन्‍यांचे नियुक्‍ती अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्‍यास येणा-या पात्र उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करण्‍यात येणार आहे.  या रोजगार मेळाव्‍यात 190 पदांसाठी  भरती करण्‍यात येणार आहे.

रोजगार मेळाव्‍यात - साई इंजिनिअरींग,अ.नगर (15), सिध्‍दी सीएनसी, अ.नगर (20), श्री लक्ष्‍मी मल्टिस्‍टेट को-ऑप अ.नगर (15), कायझन इंजिनिअर्स अ.नगर  (10), श्री संत नागेबाबा मल्टिस्‍टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी,अ.नगर  (30), आदित्‍य सोलार प्रा.लि. श्रीरामपूर(15), लिना ऑटोमोटिव्‍ह इंडिया प्रा.लि. संगमनेर (41), मयूर इंडस्टि्ज, अ.नगर (10), साईदिप अॅलॉईड एक्‍स्‍टुजन प्रा.लि. अ.नगर (10), श्री व्‍यंकटेश मल्टिस्‍टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी,अ.नगर (14) व सॅफरॉन हॉलिस्‍टीक हेल्‍थकेअर प्रा.‍लि. सुपा (10) अशा विविध कंपन्‍यामध्‍ये एकूण 190 पदांची भरती  करण्‍यात येणार आहे.

उमेदवारानी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्‍थळाला भेट देवून Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्‍यानंतर होम पेजवर पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा दिसेल. अहमदनगर हा पर्याय निवडावा. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजी होणा-या पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍यासाठी उपस्थिती नोंदवविण्‍यात यावी  व I agree हा पर्याय निवडून आपल्‍या  पात्रतेनुसार विविध कंपन्‍याच्‍या रिक्‍त पदाची निवड करुन Apply बटनावर क्लिक करुन आपले नावनोंदणी करावी.

 तसेच अधिक माहितीसाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी, अहमदनगर येथे ( दूरध्‍वनी क्. 0241-2425566 )  संपर्क साधावा, असे सहायक आयुक्‍त वि.जा मुकणे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post