जुने नायगाव शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न


श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत नुकताच पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ.राजाराम राशिनकर होते.मेळाव्याची सुरुवात उपस्थित सर्व पालकांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजनाने करण्यात आली.

यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी लाभार्थी विद्यार्थ्याच्या समाजकल्याण शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे,मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा व इतर खाजगी स्पर्धा परीक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले.विद्यार्थी गुणवत्तेसाठी पालक - शिक्षक - विद्यार्थी त्रिकोण महत्वाचा असल्याचे नमूद केले.शिक्षिका सुजाता सोळसे यांनी मुलांची वैयक्तिक स्वच्छता,आहार व आरोग्य या बाबींवर मार्गदर्शन केले.सरपंच राशिनकर यांनी वृक्षारोपण,सेंद्रिय भाजीपाला,मुलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.पालक किरण दातीर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचे जीवनातील महत्त्व सांगितले.

पालक मेळाव्याला सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे, माजी अध्यक्ष संतोष राशिनकर, किरण दातीर,सागर लहारे,प्रमोद भवार,रविंद्र लांडे, दिगंबर लांडे, सौ.निशा लांडे, मधु लांडे,तुळसा नजन, अश्विनी लांडे, ज्योती गायकवाड,उषा राशिनकर,पूजा लांडे,धनश्री बोर्डे, संदीप धसाळ, बलभीम लहारे, प्रविण बोर्डे इत्यादी पालक उपस्थित होते.शेवटी संतोष राशिनकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post