श्रीरामपूर : दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेत येथील प्रियंका रविंद्र काळे या उत्तीर्ण झाल्या आहेत.
यंदा मे महिन्यात ही परिक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल दि इन्स्टिट्युटऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने जाहीर केला. सीए अकाउंटींग आणि फायनान्समधील एक आव्हानात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम व सातत्य व चिकाटी आवश्यक असते. प्रियंका हिचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील बीएमसीसी कॉलेजमध्ये झाले. कॉलेजपासूनच प्रियंकाने सीए परीक्षेची तयारी सुरू केली होती. सात वर्षांच्या कठोर प्रयत्नातून तिने हे यश संपादन केले आहे.
प्रियंका ही येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. गोविंदराव काळे यांची नात तर स्वस्त धान्य दुकानदार रविंद्र काळे यांची सुकन्या आहे. प्रियंकाने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.