'छावा ब्रिगेड'च्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


श्रीरामपूर : छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथभाऊ वाघ यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश महासचिव राहुल रेळे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली चितळी ता.राहाता जि.अहमदनगर येथे शुक्रवारी ( दि.९) पद नियुक्तिचा कार्यक्रम संपन्न झाला.

चितळी गावचे मा. चेअरमन बाळासाहेब तात्या वाघ यांची प्रदेश सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य मा. राजूभाऊ वाणी यांची उत्तरनगर जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रकाशभाऊ आरणे यांची जिल्हाकार्याध्यक्ष, शुभम राशिनकर युवा जिल्हाअध्यक्ष, करण वाघ राहाता तालुका अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.

 या प्रसंगी चितळी गावचे प्रथम नागरिक सरपंच नारायणराव कदम यांचा ही जाहिर सत्कार करण्यात आला. धनगरवाड़ीचे सरपंच गोपीनाथ खरात, प्रशांत साबळे बहुजन वंचित आघाडी, संपत भाऊ वाघ, अविनाश भंडारी, माणिक भुसारी, इतर गावकरी सहकारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post