तख्त सचखंड नांदेड गुरुद्वारा समितीमध्ये शीख समाजाला संधी मिळावी - गुलाटी


श्रीरामपूर : तख्त सचखंड नांदेड व्यवस्थापन समितीमध्ये श्रीरामपुरातील शीख समाजातील सदस्यांची निवड करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्याकडे निवेदाद्वारे केली आहे.

            श्रीरामपूर तालुक्यातून समाजातील व्यक्तींना प्राधान्य दिल्यास देशातील मोठ्या एका धार्मिक संस्थेत त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील समाजातील नागरिकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

             5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर काही संस्था आणि लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. परंतु हा नवीन कायदा जाहीर झाल्यानंतरही व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व शीख समुदायातील असतील. ते असे असतील जे अधिकारी, तज्ञ, तत्वज्ञानी, समाजाचे विचारवंत असतील आणि समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असेल.

               राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार नवीन मंडळाचे सर्व 17 सदस्य असतील. त्यापैकी तीन निवडून येतील, दोन शिरोमणी प्रशासक समिती अमृतसरचे असतील आणि काही राज्य सरकार नियुक्त करतील. तरी या नवीन सदस्य मध्ये श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातून  शीख समाजातील सदस्याची निवड करण्याची मागणी रवींद्र गुलाटी यांनी केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातून तख्त सचखंड नांदेड व्यवस्थापन समितीमध्ये श्रीरामपुरातील शीख समाजाच्या व्यक्तींना संधी मिळावी, यासाठी लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची शहरातील शीख समाजाचे शिष्ट मंडळ भेट घेणार असल्याचे माहिती रवींद्र गुलाटी यांनी दिली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post