अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार कानडेंनी केली पाहणी; प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश

आमदार लहू कानडे यांनी रामपूर येथे पडझड झालेल्या घराची रविवारी पाहणी केली.
_____________________________________

साईकिरण टाइम्स |१० जानेवारी २०२१

श्रीरामपूर | तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. गोदावरी नदीकाठच्या भागात मात्र काढणीला आलेल्या ज्वारी व कपाशीच्या पिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. रामपूर येथे एक घर भीज पावसामुळे कोसळले. आमदार लहू कानडे यांनी या ठिकाणी रविवारी (दि.१०) भेट देऊन नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. 

हेही वाचा : रेशनकार्डला आधार व मोबाईल क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन धान्य बंद होणार

गोदावरी नदीकाठच्या नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव तसेच माळवाडगाव, भोकर, खोकर, वडाळा महादेव या परिसरात सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. रविवारी मात्र पावसाने उघडीप दिली. सध्या शेतामध्ये गहू व ज्वारीची पिके तयार झाली आहेत.

हेही वाचा : जिल्ह्याचे नाव बदलण्याची भाषा करणाऱ्या खा.लोखंडेंना जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे का? 
त्या पिकांचे पावसाने नुकसान झाले आहे. रामपूर येथे एक घर भिज पावसामुळे कोसळले. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी आमदार कानडे यांनी या परिसरातील नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांना घराची व शेतातील उभ्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post