*दत्ताभाऊ खेमनर – अहिल्या नगर व श्रीरामपूर लाभलेलं धाडसी आणि अभ्यासू नेतृत्व


 

“भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी.”

       सत्याची कास धरून असत्याला जागीच ठोकून काढणारं, व्याजासकट परतावा करणारं अहिल्यानगर व श्रीरामपूर मिळालेलं धाडसी, तरुणांसाठीचं प्रेरक आणि तितकंच अभ्यासू नेतृत्व म्हणजे दत्ताभाऊ खेमनर.

दत्ताभाऊ खेमनर हे नाव आज अहिल्यानगर राजकारणात सगळीकडेच घुमतंय . त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जिद्द, एक वेगळाच आत्मविश्वास आहे. कोणताही राजकीय वारसा नाही, राजकारण करण्याइतका श्रीमंत नाही, तरीही प्रस्थापितांच्या विरोधात रान उठवून त्यांना पळता भुई कमी पाडणारा नेता म्हणजे दत्ताभाऊ खेमनर 

राजकीय क्षेत्रात आज जेव्हा सर्वत्र घराणेशाही, जातीय समीकरणं आणि सत्तेचं राजकारण चालू आहे, तेव्हा खेमनर सारखा नेता सामान्य जनतेसाठी आशेचा किरण आहे. त्यांनी केवळ भाषणात नाही तर कृतीतून दाखवून दिलं आहे की, संघर्षाची ताकद ही कुठल्याही घराण्यापेक्षा वरचढ असते.

दत्ताभाऊ म्हणजे प्रस्थापितांच्या अन्यायाच्या धगधगत्या निखाऱ्यातून तयार झालेला हिरा.

त्यांचं बालपण गरिबीत गेलं, शिक्षण संघर्षातून पूर्ण केलं, आणि राजकारणात केवळ जिगर, अभ्यास आणि लोकांच्या प्रश्नांची जाणीव याच्या बळावर आपलं स्थान निर्माण केलं. ते आज  भाजपा जिल्हा सचिव उत्तर अहिल्या नगर आहेत, पण त्यांची खरी ताकद आहे जनतेशी जोडली गेलेली थेट नाळ .

“दत्ताभाऊ खेमनर भाजपा मधील ” म्हणणाऱ्या तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनून त्यांना योग्य दिशा देणारं नेतृत्व म्हणजे दत्ताभाऊ.

आज  तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या भाषणातील आक्रमकता, त्यांच्या बोलण्यातला साधेपणा, आणि त्यांच्या कृतीतील धाडसी प्रामाणिकपणा ही त्यांच्या लोकप्रियतेची मूळ कारणं आहेत.

त्यांनी अनेकदा राजकीय मतभेद असूनही, लोकहिताच्या प्रश्नांवर पक्षाच्या विरोधातही ठाम भूमिका घेतली आहे. आरक्षण, शिक्षण, शेतकरी, वंचित समाज, बहुजनांचे हक्क  या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि ठामपणे आपली भूमिका मांडली आहे.

जे पोटांत ते ओठांत असणारे दत्ताभाऊ खेमनर हे आजच्या तरुणांसाठी केवळ एक नेता नाहीत, तर संघर्ष, आत्मविश्वास आणि समर्पण यांचं जिवंत उदाहरण आहेत. ते तरुणांना आपल्यासारखेच वाटतात आपल्या वाडीवस्तीतील , आपल्या गावातील, आपल्या बोलीतील माणूस. म्हणूनच ते लाखो ग्रामीण जनतेच्या मनात घर करून राहिले आहेत.

अहिल्यानगर व श्रीरामपूर भाजपा मधील राजकारणात जर कोणी खरोखर “तरुणांच्या गळ्यातील ताईत ” म्हणून ओळखला जात असेल, तर तो म्हणजे दत्ताभाऊ खेमनर.

आत्ता एकच भाऊ दत्ता भाऊ

हे केवळ घोषवाक्य नाही, तर नव्या अहिल्यानगर व श्रीरामपूर बदलाची सुरुवात आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post