अखिल भारतीय हिंदू परिषदेकडून दरवर्षी हा पुरस्कार हिंदू धर्म प्रचार प्रसार, जिहाद्यांकडून हिंदू धर्मावर होणारे आघात जसे की लवजिहाद,गोहत्या, लँडजिहाद थोपवण्यासाठी हिंदूंना जागृत करण्याचे अहोरात्र झटून कार्य करणाऱ्या धर्मरक्षकास दिला जातो.यावर्षीच्या पुरस्कारासाठी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांची निवड झाल्याचे हिंदू धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता भाऊ खेमनर यांनी काही दिवसापूर्वीच जाहीर केले होते.काही दिवसापूर्वी बारामती येथे अहिल्यामाता होळकर जयंती समितीच्या वतीने सागर बेग यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्कार ग्राम विकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.सागर बेग यांच्या हिंदू धर्मकार्यांची दखल राज्याबरोबरच राज्यबाहेरील हिंदुत्ववादी संघटनांनी देखील घेतली आहे.
शिर्डी येथील कार्यक्रम प्रसंगी शुभाशीर्वाद देतांना कृष्णानंद कालिदास महाराज म्हणाले की, हिंदू धर्म कार्यात सतत अग्रनी राहणाऱ्या सागर बेग यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्कार प्रदान करण्याचे सौभाग्य मला शिर्डी या पावन भूमीत प्राप्त झाले आहे.पुरस्कार सभारंभा चे कोणतेही पूर्व असे नियोजन नव्हते परंतु दत्तात्रय महाराजांच्या कृपेने आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे.सागर बेग यांचे कार्य आमदारापेक्षा कमी नसल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला व सागर बेग यांच्या धर्मकार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्कार सभारंभास उद्देशून बोलताना सागर बेग म्हणाले की, कृष्णानंद कालिदासजी महाराजांच्या हस्ते मला हिंदू धर्मरक्षक पुरस्कार मिळाल्याने माझ्या धर्मकार्यांची गती आणखी वाढणार आहे. आजपर्यंतच्या माझ्या धर्मकार्यांची आजच्या पुरस्काराच्या रुपाने मला पावतीच मिळाल्याचे त्यांनी सांगितले.एकोणीस वर्षांपूर्वी मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा जिहादी आरोपीना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले त्यावर नाराजी व्यक्त करत सागर बेग म्हणाले की,2014 साली हिंदुत्ववादी शासन सत्तेत आल्यामुळे बॉम्बस्फ़ोटातील आरोपीना सुटण्याची शास्वती नव्हती.या दुर्घटनेत 209 निष्पाप हिंदू मारले गेले तर असंख्य लोक जखमी झाले होते.या गुन्ह्यातील बारापैकी पाचजणांना फाशी आणि सातजणांना जन्मठेपेची शिक्षा मुंबईतील कनिष्ठ कोर्टाने सुनावली असतांना वरिष्ठ नायालयाने त्यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडून देणे हे भारतीय हिंदूंसाठी मोठे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हिंदू धार्मियांचे मनोबल खचवणारा हा दुर्भाग्यपूर्ण निकाल पोहचवण्याचे आवाहन सागर बेग यांनी याप्रसंगी कालिदास महाराजांना केले.
हिंदू धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहाता,कोपरगाव तालुक्यातून असंख्य धर्मरक्षक कार्यकर्ते उपास्थित होते. राष्ट्रीय श्रीराम संघांचे राहता तालुकाध्यक्ष मदन भाऊ मोकाटे, तुषार थेटे यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य असे नियोजन केले होते.