उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सागर बेग यांची मध्यरात्री तीन वाजता भेट ; पालिका निवडणूकीची चर्चा, शहराच्या दृष्टीने महत्वाची भेट


श्रीरामपूर : भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनाचा हाच मोठेपणा इतरांपेक्षा त्यांच श्रेष्ठत्व सिद्ध करतो.

             ठाकरे शिवसेनेतील जवळपास सगळेच आमदार गुवाहटीला घेऊन गेल्यानंन्तर महाराष्ट्रच सोडा संपूर्ण भारतात ज्यांच्या नावाचा बोलबाला झाला ते एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिनीचा भाऊ तर रुग्णांना मदतीचा हात देणारे नाथ झालेत तेच एकनाथजी शिंदे आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ही विसरलेले नाहीत दिवसभर मंत्रालयात राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळून मध्यरात्री पर्यंत शिवसैनिकांनाही वेळ देणारे कुशल नेतृत्व कदाचित महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले असेल.

             मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आजही महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आहेत.लाडकी बहीण योजना ही सुपीक कल्पना देखील एकनाथ शिंदेचीच. विरोधकांची वैचारिक पातळी जिथं पर्यंत आहे तेथून पुढे ज्यांचे विचार सुरु होतात त्या एकनाथजी शिंदेनी याच योजनेच्या जोरावर विरोधकांचा सुफडा साफ केलेला आहे.

           श्रीरामपुरातून खास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी व महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी गेलेले राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष व शिवसैनिक सागर बेग यांना दिवसभर कामाच्या व्यापातून वेळ देता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री तीन वाजता स्वतःच्या राहत्या घरी बोलावून सागर बेग यांची भेट घेतली. जवळपास एकतास सागर बेग यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली व काही मार्गदर्शन देखील केले. नगरपालिकेच्या निवडणूकीबाबत झालेली ही भेट श्रीरामपूर शहराच्या दृष्टीने महत्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या या मनमिळावू स्वभावामुळेच ते आज विरोधकांमध्ये सुद्धा लाडके भाऊ म्हणून फेमस आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post