श्रीरामपूर मतदारसंघात अधिकारी गब्बर ; उप अभियंता रविंद्र पिसे, बापुसाहेब वराळेंच्या टक्केवारीमुळे निकृष्ट कामे, भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय नाही


साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे | न्यूज ट्रीटमेंट - भाग १

श्रीरामपूर : श्रीरामपूर मतदारसंघात ठेकेदार व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची भक्कम युती झाली आहे. निकृष्ट दर्जाचे कामे करून कंत्राटदार व अधिकारी स्वतःचे खिसे ठासून ठासून भरत आहे. बांधकाम प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक वाढीव रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करतात.  अधिकाऱ्यांचे जवळचे ठराविक कंत्राटदार कामे घेतात. इस्टीमेंट मधे तरतुद केलेल्या रक्कमेपेक्षा अत्यंत कमी खर्चात, दर्जाहीन कामे करून बांधकाम विभागातील अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.

श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बापुसाहेब वराळे व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम श्रीरामपूर उपविभागाचे उपअभियंता रविंद्र पिसे यांनी टक्केवारी घेऊन श्रीरामपूर मतदारसंघातील रस्त्यांचा अक्षरशः खेळखंडोबा केला आहे. अधिकारी व ठेकेदार शासनासह जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते काही दिवसात खराब होतातच कसे? असा सवाल राजेश बोरुडे यांनी केला आहे. लोकप्रतिनिधीही अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका राजेश बोरुडे यांनी केली आहे.

उप अभियंता रविंद्र पिसे श्रीरामपूर मुख्यालयी वास्तव्य करीत नाही. आरटीआय अंतर्गत दिशाभूल करणारी थातूरमातुर अर्धवट माहिती देतात. रविंद्र पिसेंविरोधात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. पिसेंनी पदाचा दुरुपयोग करून मोठी माया कमविली आहे. फ्लॅट सिस्टिम,मालमत्ता, निकृष्ट रस्ते आदीबाबत प्रशासनाकडे गंभीर तक्रारी झाल्या आहेत. रविंद्र पिसेंविरोधात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. शासकीय पदाचा गैरवापर करून अनेक वर्षांपासून लूट करणाऱ्या उपअभियंता रविंद्र पिसे यांची श्रीरामपूर मधून हकालपट्टी करण्यासाठी मोहीम उघडणार असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.

'जनता उपाशी अधिकारी तुपाशी' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता मालक आहे. जनतेच्या पैशाचा उपयोग जनतेसाठीच झाला पाहिजे. पण, भ्रष्ट अधिकारी केवळ त्यांचे घरे भरण्याचे काम करत आहेत. श्रीरामपुरात आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पोलीस, कृषी विभागात मोठ्या तक्रारी आहेत. अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अन्याय होत असेल तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post