लायन्स क्लब कडून राजेन्द्र देसाई सन्मानित


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तसेच श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले गृहरक्षक दलाचे  राजेंद्र देसाई यांना लायन्स क्लब श्रीरामपुर यांचे कडून आदर्श होमगार्ड म्हणून सन्मानित करण्यात आले.

            यावेळी लायन्स क्लबचे नुतन पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते दिक्षा प्रदान करण्यात आली तसेच नवनिर्वाचित पद संपादन करणाऱ्या सर्वांना मान्यवरांकडुन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.

            राजेन्द्र देसाई यांनी गृहरक्षक दल  सामाजिक . अध्यात्मिक पत्रकारीता  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली तसेच अनाथ निराधार गरजु  विद्यार्थ्यांसाठी  मदत कार्य करत आहे तसेच पोलीस प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून गृहरक्षक दलाचे कामकाज पाहत असताना रस्ता अपघातामध्ये अनेक नागरिकांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले वयोवृद्ध नागरिकांसाठी विविध संस्थेच्या माध्यमातून गरजु व्यक्तीना चष्मे वाटप मोफत आरोग्य शिबिर अशा कार्यक्रमाचे आयोजन करत ठिकठिकाणी वृक्षारोपन केले आहे.  

                       सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र सराला बेट गोदाधाम या ठिकाणी दिंडी उत्सवाचे आयोजन करून पायी दिंडी सोहळा आयोजित करत आहे. राजेन्द्र देसाई यांच्या कार्याची दखल घेत लायन्स क्लबचे पदाधिकारी यांनी श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन यांचे कडून माहिती घेत आदर्श पोलिस होमगार्ड यांना  सन्मानीत करत असतात देसाई यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत  याबद्दल पोलीस निरीक्षक नितीन देशमुख  उपनिरीक्षक समाधान सोळुंखे  उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलीस हवालदार शफिक शेख संतोष परदेशी रघुवीर कारखिले मच्छिंद्र शेलार पो ना किरण टेकाळे  राहुल नरवडे रमिज आत्तार गौतम लगड पो कॉ रमेश रोकडे वसीम इनामदार प्रविण कांबळे आदिनी  शुभेच्छा दिल्या प्रसंगी लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन  पोलीस हवालदार शफिक शेख यांनी करत आभार व्यक्त केले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post