साईकिरण टाइम्स | ३१ जानेवारी २०२१
पावन गणपती मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे. या जागेचा मूळ मालक अहिल्याबाई होळकरांचा कारभारी वाणी हे होते. अहिल्याबाई होळकरांनी ही जमीन इनाम म्हणून दिली होती. गट न 134 ही जमीन राजाराम यादव यांनी 1902 साली वाणी यांच्याकडून खरेदी केली. तेव्हा येथे सध्या मंदिरासमोर असलेल्या विहरीला तुडुंब भरून पाणी असायचे. त्याकाळी या विहरीत सदाफळ व मगरकर यांच्या मोट चालत असे. पुढे या नैसर्गिक भागात बाबासाहेब डहाणूकर यांनी लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून येथे पहिला खाजगी कारखाना काढला. तेव्हा भंडारदरा धरणाचे काम चालू होते. पाट चालू होता. स्वतःचा ऊस मळा असावा यासाठी बाबासाहेब डहाणूकर यांनी शेतकऱ्यांकडून खंडतत्वावर जमिनी खरेदी केल्या. टिळकांच्या प्रेरणेतून डहाणुकरानी वाडयांना देशभक्तांची नावे दिली. त्यावेळेस खंडाळा येथे गट नं 134 व परिसरातील जमिनी टिळकनगर कारखान्याने खंडाच्या तत्वाने घेतल्या. तेव्हा ऊस लागवडीसाठी नांगरत असताना ट्रॅक्टरच्या चैनला एक मूर्ती लागल्याने तो ट्रॅक्टर जागचा हालत नव्हता. तेव्हा त्यावेळचे तत्कालीन शेतकी अधिकारी पालवे यांनी उकरून पहिले असता गणपती मूर्ती आढळली. मूर्ती लिंबाच्या झाडाला लागून होती. ती मूर्ती तेथून काढून स्वछ करण्यात आली. मूर्ती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. लोकं दर्शन घेऊ लागले. दर्शनसाठी लोकांची रीघ लागली. तत्कालीन शेतकी अधिकारी पालवे यांचे वय 50 च्या दरम्यान असतानाही त्यांना मुलबाळ होत नव्हते. पालवे यांनी गणपतीला नवस केला असता त्यांना मुलगा झाला. त्यांनी सर्वांना जेवण दिले. गणपतीची पूजा अर्चा केली.
मूर्ती सापडल्या नंतर त्या मूर्तीची सर्वधर्मीय लोकं पूजा अर्चा करायला लागले. लिंबाच्या झाडाच्या खोडालगत मूर्ती होती. लोक दर्शन घायचे. मूर्तीवर छत्र नव्हते ऊन लागायचे. पावसाळ्यात पाऊस पडायचा. त्यामुळे परिसरातील लोकांनी छप्पर मूर्तीवर छप्पर बांधले. मुस्लिम धर्माचे बक्षुभाई शेख यांना गणपतीचा साक्षात्कर होत असे. तत्कालीन सरपंच ढोकचौळे कारभारी, उपसरपंच सत्यभामा सदाफळ हे जमिनीचे मूळ मालक असलेल्या यांच्या संकल्पनेतून बक्षुभाई शेख यांनी पाचटाचे मंदिर हटवून पत्र्याचे मंदिर केले. 1969 1990 साली याठिकाणी नवीन प्रशस्त मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात अजूनही सर्व जाती धर्माचे पुजारी पूजा करतात.
खंडाळा येथील पावन गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे कि जिथे ब्राम्हणांशिवाय इतर सर्वजाती धर्माचे लोक गणपतीची पूजा अर्चा करतात.
महाराष्ट्रात ऊस लागवड करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते त्या प्रेथेची सुरवात खंडाळा येथूनच झाली आहे. आजही शेतकरी ऊस लागवड करताना गणपतीची पूजा करतात. कोणतेही नवीन वाहन घेतले तरी बहुतांशी लोक खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला येतात.
चतुर्थीला, मंगळी चतुर्थीला पावन गणपतीचे दर्शन घेण्यासाठी श्रीरामपूर सह परिसरातील लाखो लोक येत असतात.
विशेष म्हणजे गणपती मंदिर उभारणीची कल्पना मुस्लिम धर्मीय बक्षुभाई शेख यांची होती. त्यांनी निवृत्तानंतर मंदिरासाठी जाहीर न करता गुप्तदानाने काही रक्कम दिली होती.बक्षुभाई शेख यांना नमाज पडत असताना गणपतीचा साक्षत्कार होत असे.