साईकिरण टाइम्स | ३१ जानेवारी २०२१
उक्कलगाव | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकण वस्ती मधील विद्यार्थ्याना शालेय आहार शिजल्यानंतर जेवणासाठी उन्हात बसावे लागत आहे. शाळेच्या नियोजित शेडसाठी पत्रे बसविण्याकरिता लवकरच लवकर निधी उपलब्ध करून देवू ,अशी ग्वाही दत्तनगर गटाचे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. आशाताई बाबासाहेब दिघे यांनी पालकांच्या शिष्टमंडळाला दिले. शेडसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. दिघे यांनी तात्काळ जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाचे अध्यक्ष प्रतापराव शेळके यांच्याशी संपर्क साधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली. शाळेच्या आवारात असलेला धोकादायक विजेचा खांब संबधीत अधिकारी यांना सांगून त्वरित इतरत्र हालवा मागणी करत आश्वासन यावेळी पालकांना दिले.
याप्रसंगी उक्कलगावच्या उपसरपंच सौ. सुरेखा विकास थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे गोरख थोरात, उपाध्यक्ष रावसाहेब शिंदे, सोमनाथ मोरे, जालिदर थोरात, दत्तात्रय मुठे, अनिल गवळी, मनोज धनवटे, सद्दाम शेख, शाहीर शेख, भाऊसाहेब गाडे, दत्तात्रय काळवाघे,सुभाष दरंदले, अशोक रहाटे, शिक्षक सोमनाथ अनाप, प्रशांत बोरूडे, आदीसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.