पंतप्रधान व माजी राष्ट्रपातींचे फोटो अडगळीच्या खोलीत धूळखात पडलेले; भाजपा नेते प्रकाश चित्ते यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर


श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे फोटो पडलेले दिसत आहेत.

__________________________________

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 सप्टेंबर 2020

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे एका अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे फोटो  अस्तव्यस्त पडलेले भाजपा नेते प्रकाश चित्ते यांच्या निदर्शनास आले. या संतापजनक प्रकारावरून चित्ते यांनी उपप्रादेशिक अधिकारी ए. ए. खान यांना धारेवर धरत दोषींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तोंडी माफी मागून, दिलगिरी व्यक्त करत दोषींवर कारवाईचे करण्याचे लेखी पत्र दिले. 


           भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हे कामानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले असता दुसऱ्या मजल्यावरील विश्रामगृहाच्या एका खोलीला अडगळीची खोली बनवून सारा कचरा या खोलीत टाकलेला होता. अशा खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा फोटो आढळले. चित्ते यांनी त्याचे फोटो काढून ही घटना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना धारेवर धरले व दोषींवर कारवाईची मागणी केली.


               या अडगळीच्या खोलीत हे फोटो कधीपासून आहेत ? तेथे ते कोणी नेऊन टाकले ? तेथे टाकणाऱ्यांचा हेतु काय  ? टाकणाऱ्या दोषींवर कारवाई करणार काय ? अशा अनेक प्रश्नांचा चित्ते यांनी भडिमार करून श्री खान यांना धारेवर धरले. यावेळी परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी घडलेल्या प्रकारबद्दल माफी मागितली असल्याचे चित्ते यांनी म्हंटले आहे. दरम्यान, श्री चित्ते यांनी लेखी द्या अशी मागणी केली. यावर ए. ए. खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाईचे लेखी पत्र दिले तेव्हाच श्री चित्ते यांनी आरटीओ ऑफिस सोडले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post