श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात जिजामाता,सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावच्या उपसरपंच पुष्पाताई लांडे होत्या.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले.गावचे सरपंच डॉ. राजाराम राशिनकर यांनी महिला दिनानिमित्त आहार,आरोग्य,पर्यावरण संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गावच्या उपसरपंच पुष्पाताई लांडे,माजी उपसरपंच मिनाताई लांडे,सेवा सोसायटीच्या चेअरमन शितल लांडे,शिक्षणप्रेमी माता इंदुबाई लांडे,आशा सेविका निता लांडे,अंगणवाडी सेविका हिराबाई त्रिभुवन,शाळा समितीच्या माजी अध्यक्षा मनिषा राशिनकर,मिताली दातीर,राणी वाघ,मंगल लांडे,संगीता दातीर,रोहिणी राशिनकर,कमल दातीर इत्यादी माता-भगिनींचा महिला दिनाच्या निमित्ताने नॅपकिन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मिताली दातीर,मिनाताई लांडे,पुष्पाताई लांडे,हिराबाई त्रिभुवन,रोहिणी राशिनकर यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनानिमित्त नारीशक्तीचे महत्व विशद केले.शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी कार्यक्रमास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर,बापूसाहेब लांडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर उपाध्यक्ष अशोक वाघ,दिलीप लांडे,रमेश दातीर,महेश राशिनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी संतोष राशिनकर यांनी सर्वांचे आभार मानले.