सात्रळ (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कै.यादवराव दशरथ वाघचौरे यांचे नुकतेच दुखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,सहा मुले,एक मुलगी,जावई,नातवंडे,असा परिवार आहे. ते मनमिळाऊ व धार्मिक प्रवृत्तीचे होते.केशव यादवराव वाघचौरे, राजेंद्र यादवराव वाघचौरे, विजय यादवराव वाघचौरे, जालिंदर यादवराव वाघचौरे, संजय यादवराव वाघचौरे,बाबासाहेब यादवराव वाघचौरे याचे ते वडील होते. दशक्रिया विधी दि.२७/०९/२०२० रोजी रविवार सकाळी ८ वाजता दत्त पानथा सात्रळ येथे होईल.