साईकिरण टाइम्स ब्युरो, 20जून 2020
सोनई ( दादा दरंदले ) महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंञी ना शंकरराव गडाख यांनी नगर जिल्हातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे भेट दिली. राज्याचा जलसंधारण खात्याचा पदभार घेतल्यानंतर हिवरेबाजारला पाहणीसाठी ही पहिलीच भेट दिली. राज्यामध्ये हिवरेबाजार या गावाचा मोठा नावलौकिक आहे. जलसंधारणाची व वनराईची मोठे काम या गावात झाले असल्याने देशातील अनेक भागातील लोक पाहणी करण्यासाठी येथे येतात.
आज राज्याचे जलसंधारणमंञी नाम. शंकरराव गडाख यांनी भेट देवून राज्य आदर्शगाव कार्यसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या समवेत आदर्शगाव हिवरेबाजार या गावी भेट देवून विकासकामांची पाहणी केली. त्यात हिवरेबाजार येथे जलसंधारण विभागा मार्फत झालेली विकास कामे,सिमेंट बंधारा,डोंगरावरचे समतल चर,वनराई,आधुनिक गोठा,सीताफळ बाग,यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या कामाची पाहणी करून वृक्षारोपण केले.जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेली व झालेली विकास कामे व आदर्शगाव योजना कामाची आढावा बैठक घेतली गेली. यावेळी जलसंधारण खात्याअंतर्गतच्या आदर्शगाव योजनेचे कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह हिवरेबाजारचे ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.