साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे चीनचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्यात चिनी वस्तू ठेवत त्याचे घोडेगाव मेन पेठ रोड येथे दहन करण्यात आले.
गलवान घाटी येथे चीन देशाच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केला. यात शहीद झालेल्या २० जवानांना मानवंदना देवुन चीन देशाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून चिनी वस्तूंचा बहिष्कार करत घोषणा देत त्याचे दहन करण्यात आले. यावेळी 'भारत माता की जय', 'वीर जवान तुझे सलाम' अशा घोषणा देण्यात आला.
चिनी सरकारने भारतातील लोकांना हिंदी चीनी भाई भाई म्हणत आधीच खुप मोठा भाग गिळंकृत करुन ठेवलेला आहे. गलवान घाटीत भारत आपल्या स्वत:च्या भागात रस्ता बांधत असतांना चीनचे सैनिक त्यात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करु लागले़ त्यावेळी आपले आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले़ त्यातुन भारताचे २० सैनिक शहीद झाले तर चिनला सडेतोड उत्तर देत त्यांचे पण ४५ वर सैनिक यमसदनी पाठविले. अशा विकृत चीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या डोक्यात चप्पल, काठ्या घालुन पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी राजेंद्र जाधव सुधीर नाथा वैरागर पांडुरंग शेरे जगन्नाथ लोंढे ग्रा प सदस्य मधुकर आल्हाट मनोज नहार फारूक शेख सुनील आल्हाट डॉ चौधरी सुनिल गोंटे पो.पा.भगत वैरागर तटामुक्ती अध्यक्ष सुधाकर बर्डे सुनील व्यवहारे वसंत आल्हाट प्रशात कुलकर्णी आदी उपस्थित होते.