स्थानिक प्रश्न मांडताना लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क करावा ; युवा खासदार उन्मेष दादा पाटील, भाजपाच्या व्हर्चुअल सभेत श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरच्या सर्वांगीन विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटीबध्द असून स्थानिक विकास कामांचे प्रश्न मांडतांना लोकप्रतिनिधी जर दुर्लक्ष करीत असतील तर भाजपा कार्यकर्त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे प्रतिपादन जळगावचे युवा खासदार उन्मेष दादा पाटील यांनी  केले.

                मोदी सरकार २ ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  भाजपाच्या वतीने आयोजित व्हर्चुअल सभा व व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांशी सवांद साधताना खा. पाटील बोलत होते. यासभेस  जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, मोदी सरकार संपर्क अभियान जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे हे ऑनलाईन उपस्थित होते. व्हर्चुअल सभा जिल्हा संयोजक योगीराज परदेशी, शहर संयोजक विशाल अंभोरे, सोशल मिडिया जिल्हा संयोजक विशाल यादव, व्हिडीओ कॉन्फरन्स चे जिल्हा संयोजक परिमल देशपांडे यांनी संयोजन केले.

             खासदार पाटील बोलताना पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला असून देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन कोरोनाच्या परिस्थितीत केलेलं काम उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढले. २०१४ ला नरेंद्र मोदी सरकार देशात आले. आणि त्यांनी गरिबाला प्रतिष्ठा देण्याचे काम केले आहे. गरिबांची जनधन योजनेतून बँक खाते, मोफत उज्जवला गॅस योजना, मोफत सौभाग्य वीज योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, मोफत शौचालय योजना राबवून गरीब कल्याण योजना राबविल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून शत्रू राष्ट्रला वठणीवर आणण्याचे काम केले.     

                 २०१९ ला जनतेने सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र घेऊन मोदींनी देश सामाजिक, आर्थिक, जागतिक व देशांतर्गत पातळीवर सर्व बाबतीत आगेकूच करत आहे. राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी कलम३७० रद्द करणे असो किंवा जनभावना लक्षात घेऊन रामंदिर निर्माण असो तीन तलाक असो किंवा नागरिकत्व कायद्यातील सुधारणा असो यामुळे एका वर्षात जनतेची मोदी सरकार विषयीच्या भावना पल्लवित झाल्या. शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, असंघटित कामगार यांना तीन हजार पेंशन योजना सुरू केली असून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून वर्षाला सहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.

           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी २०लाख कोटी रुपये चे पॅकेज या दिशेने उचलले एक मोठे पाऊल आहे. या अभियानातून प्रत्येक नागरिक उभा राहील असा आत्मविश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला. या प्रसंगी अशोक चे संचालक बबन मुठे, व्यक्तीगत संपर्क जिल्हा संयोजक गणेशजी राठी, शशीकांत कडूस्कर सर, सतिश सौदागर, मारूती बिंगले, अनिल भनगडे, बाळासाहेब धनवटे, विजय लांडे, प्रफुल्ल डावरे, अक्षय वर्पे, महेश खरात, मुकुंद हापसे, प्रणव भारत, पुरुषोत्तम भराटे, संजय माखीजा, अविनाश काळे, सौरभ खरात, सुमित बोरुडे, रवि पंडित,ओंकार झिरंगे, आनंद बुधेकर व शेकडो कार्यकर्ते ऑनलाईन ऊपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक तालुकाध्यक्ष सुनील वाणी यांनी तर शेवटी आभार  बबन मुठे यांनी मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post