येथील पालिकेच्या व्हरांड्यात नगर पलिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत कार्ले, उपमुख्याधिकारी अय्युब सय्यद, कर निरीक्षक धनंजय कविटकर, नगर अभियंता श्रीराम सरगर, स्थापत्य अभियंता सूर्यकांत गवळी, स्थापत्य अभियंता अनंत शेळके, विद्युत विभाग प्रमुख रावसाहेब घायवट, अंतर्गत लेखापरीक्षक सायखेडे जयश्री, आरोग्य विभाग प्रमुख दीपक खोबरगडे, पाणीपुरवठा अभियंता मनोजकुमार ईश्वरकट्टी, संगणक अभियंता पुरण धांडे, कर प्रशासकीय अधिकारी शितल काळे, लिपिक दिपक मारशिया, प्रमोद माने, अमोल साळुंखे, ज्ञानेश्वर छल्लारे, प्रवीण ढुमने, मिलिंद देवकर, आस्मा शेख, अशोक वाघ, संतोष पंडागळे,वैभव चव्हाण, अनुप झरेकर, सचिन जोगदंड, सिद्धार्थ गवारे, अमोल गायकवाड, नरेंद्र चव्हाण, गणेश गवळी, सोमनाथ मगर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
नगरपरिषद, नगरपंचायती मधील सन २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्यापपावतो कोणतीही पेंशन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच, शासनाने संघटनेच्या समस्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. याबाबत संघटनेमार्फत वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आलेली आहेत. परंतु, अधिकारी, कर्मचा-यांच्या मुलभूत समस्या व मागण्या याबाबत शासनामार्फत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. त्यामुळे दि.२९ ऑगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी आज येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्य मागणीचे निवेदनही स्वीकारले.