श्रीरामपूर पालिका हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण असताना एकाच व्यापाऱ्यावर अन्याय का ? कारवाई करायची असेल तर शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामांवर करा; अन्यथा आंदोलन : रिपाई, मनसे, भिमशक्ती संघनेचा पालिका प्रशासनाला इशारा


श्रीरामपूर : श्रीरामपूर पालिका हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण असताना त्याकडे कानाडोळा करून पालिका प्रशासनाने एकाच व्यवसायिकाला नोटीस दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी मोठ-मोठे अनाधिकृत बांधकाम असतांना एकाच व्यापाऱ्यावर अन्याय का ? असा सवाल रिपाई, मनसे, भिमशक्ती संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कारवाई करायची असेल तर शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामांवर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्ती संघटनेचे संदीप मगर यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

रिपाई, मनसे, भिमशक्ती संघनेच्या वतीने पालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एखाद्या व्यावसायिकाला जाणून-बुजून टार्गेट करुन त्रास देण्याचे या स्वयंघोषीत संघटनेचा उद्देश आहे. स्वयंघोषीत संघटनेच्या तक्रारीवर एखादया व्यवसायिकास नोटीस देवून कारवाई करणार असाल तर ही चुकीची बाब आहे. श्रीरामपूर शहरामध्ये अनेक अतिक्रमण आहे. त्यात हॉटेल, दुकान इमारत बांधकाम झालेले व सध्या नेवासा रोडलाच चालु आहे, असे असताना एकाच व्यावसायिकाला जाणून-बुजून टार्गेट करुन त्रास देण्याचे या स्वयंघोषीत संघटनेची प्रशासनाने माहिती घ्यावी, असे निवेदनात म्हंटले आहे.

नगरपालिकेला अतिक्रमण काढायचेच असेल तर नगरपरिषदेच्या जागेवर व इतर शासकीय जागांवर मोठ-मोठे अनाधिकृत बांधकाम दाखवतो, प्रशासनाने ते सर्वच अतिक्रमण काढावे. जेणेकरून कायदा सर्वांना समान आहे, असा संदेश जाईल. कोणत्याही एका व्यक्तीच्या बांधकामाला मुद्दामहून त्रास देण्याच्या कोणाचा उद्देश असला तरी नगरपरिषदेत अशा तक्रारदाराला भिक घालत नाही, अशी नगरपरिषद अधिकाऱ्यांनी स्वयंमघोषीत संघटनेला जाणीव करून द्यावी.

कारवाई करायची असेल तर सरसकट  अतिक्रमण काढावे, अन्यथा रिपाई, मनसे, भिमशक्ती अशा सर्वच पक्षांच्या वतीने  पूर्व सुचना न देता नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post