साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 जून 2020
बेलापूर | "योग" ही जीवनशैली भारताने जगाला दिलेली एक अमुल्य देणगी आहे. भारतात उगम पावलेली योगगंगा आता विश्वाच्या कानाकोपर्यात सर्वदूर पसरली आहे. तर माननीय मोदीजीच्या अप्रतिक संकल्पनेचा भाग होवून आज सुमारे 204 देशात 21 जून हा जागतीक योग दिन म्हणून साजरा होत आहे.आपण सर्वानी सुदृढ, आरोग्य संपन्न भारत घडविण्यासाठी नियमीत योगसाधना करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी भाउसाहेब पाटील वाबळे यांनी केले.
बेलापूर, बेलापूर खुर्द, बन,केसापूर, येथील पतंजलि योग समितीच्या वतीने बेलापूर खुर्द बन येथील येथील मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या योगगंगा शिबीरात ते अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. यावेळी भारत स्वाभिमान समिती तालुका प्रभारी अशोक मेहेञे, योग शिक्षक शिवाजी राजे देवकर,दिलीप भगत,अर्जूनराव कुर्हे,व्दारकानाथ बडधे,सोमनाथ वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पतंजली योग,भारत स्वाभिमानचे माध्यम प्रतिनिधी विष्णुपंत डावरे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी भस्ञिका प्राणायाम,कपालभाती,अनुलोम—विलोम या तीन योगक्रिया,प्राणायाम बरोबरच जलनिती —म्हणजे—मीठयुक्त कोमट पाणी एका नाकपुडीतूनआत सोडायचे व दुसर्या नाकपुडीतून बाहेर काढणे. ह्या क्रियेमुळे नाक, कान, घसा,व घश्याचा जवळचा भाग स्वच्छ होतो. जलनिती रोखेल कोरोना विषाणूचा शरीरातील प्रवेश झाला असला तरी विषाणू नष्ट होतो. हा कोरोनाशी लढण्याचा उत्तम,साधा, सोपा उपाय असल्याचे बिहार योग विद्यापिठाचे परमहंस निरंजनानंद महाराज यांनी म्हटल्याचे डावरे यांनी या वेळी सांगितले.
स्थायी समितीने सलग पाच वर्ष अखंडपणे चालविल्याबद्दल — सोमनाथ वाकडे, रामेश्वर सोमाणी,पंढरीनाथ बोर्डे, प्रभाकर क्षीरसागर,सुर्यकांत पुजारी,अशोक उंडे,बाळासाहेब भगत,सोहम देवकर,विनोद जोशी आदींचा सन्मान करण्यात आला. तर मोबाईल व्हाॅटसअॅप वरील श्रीहरिहर योग ग्रुपचा पाचवा वर्धापण दिन सोहळा साजरा करण्यात आला.