साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) 'कोरोना’ विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर, एकलहरे येथील ग्रामपंचायतीने उद्यापासून 10 ते 12 एप्रिल तीन दिवस 100 टक्के कडकडीत बंद पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यावेळी दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, कोरोना विषाणूचा स्वतःसह कुटुंब आणि समाजाने संघटितपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. गर्दीत जाणे टाळून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शासनाचे आदेश पाळा. परिसरात नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी 3 दिवस घराबाहेर न पडता स्वत:बरोबर इतरांच्या रक्षणाची खबरदारी घ्यावी, ग्रामस्थ, व्यसायिक, किराणा, भाजीपाला सह इतर व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय परिसरात करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे, खादी ग्रामउद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकलोळ, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, दत्तनगरचे तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र गायकवाड, माजी सरपंच पी. एस. निकम एकलहरेचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सिराज आलम, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सौ. सारिका कुंकलोळ, एकलहरेच्या सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच रवींद्र भालेराव, माजी उपसरपंच नसिमखातून जहागिरदार, ग्रामपंचायत सदस्य म्हसू काका सुरडकर, राजू पटेल, सुरेश बर्डे, वैशाली मकासरे, कोकिळा अग्रवाल, बेबी रावण निकम , दत्तनगर ग्रामपंचायतचे सदस्य सुनील शिंदे, राणी खाजेकर, मयुरी बागुल, हिरालाल जाधव, सोनुबाई लोंढे, शाकेरा बागवान, सुखदेव जगताप, कैलास पगारे, मोहन आव्हाड, मालती पठारे, वृशाली कुंकलोळ, किरण खंडागळे, प्रदीप गायकवाड, रुपाली बागुल, अरुण वाघमारे, आम्रपाली विघे सह पोलीस पाटील अनिल गायकवाड आदींनी केेले आहे. बंद काळात अत्यावश्यक सेवा दवाखाना, मेडिकल सेवा सुरू राहतील.
खुप छान
ReplyDeleteअजूनही बऱ्याच ठिकाणी राशन दुकान दराचा काळा कारभार चालूच आहे
ReplyDeleteHindfirayna चांगला चोप दिला पाहिजे
ReplyDelete