साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 एप्रिल 2020
अहमदनगर (दादा दरंदले) शिक्षक भारती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी सिकंदर अजिज शेख यांची नुकतीच निवड झाली असून शेख हे शेवगाव तालुक्यातील नवजीवन माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत आहे.
शिक्षण क्षेत्रात अनेक लहान मोठ्या आंदोलन मोर्चा धरने आंदोलन सक्रिय सहभाग घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. या सर्व निर्भीड कामाची दखल लक्षात घेत जिल्हा कार्यकारणीच्या व्हिडीओ कॉन्फरन्स मीटिंग मध्ये कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब जगताप तसेच राज्य सचिव श्री गाडगे सर, सरचिटणीस श्री विजय कराळे, कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब लोंढे, श्री जितेंद्र आरु, श्री महेश पाडेकर सर यांनी त्यांची एकमताने निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षक आमदार कपिल पाटील व संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे तसेच आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.