साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 एप्रिल 2020
राहुरी | देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे सुरू असलेल्या घरपोहच अन्नदान सेवेची पाहणी करण्यासाठी राहुरीचे तहसिलदार फियासुद्दीन शेख यांनी भेट दिली. तालुक्यातील मशीन द्वारे दररोज 4 हजार चपाती बनविण्याचा हा पहिला एकमेव प्रयोग पाहून या अन्नदान सेवेबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले. शासनाच्या वतीने या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी चैतन्य मिल्क चे गणेश भांड, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, साई आदर्श मल्टिस्टेट चे शिवाजीराव कपाळे, डॉ. विजय मकासरे, पत्रकार शिवाजी घाडगे, श्रीकांत जाधव, व्यापारी असो. चे विष्णुपंत गिते, स्वप्नील कुंभार, निलेश कुंभार, प्रतीक जाधव, सागर भालेराव, शिव व्याख्येते हसन सय्यद, जयेश सुडके, ऋषी राऊत, अमोल पाटोळे, आदेश तारडे, बंटी सेकडे आदी उपस्थित होते.