Shrirampur : बाजार समितीने कांदा मार्केट त्वरित चालू करावे ; करण ससाणे , पदाधिकारी व सचिवांशी केली चर्चा


साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
श्रीरामपूर (वार्ताहर) श्रीरामपूर बाजार समितीने कांदा मार्केट त्वरीत चालू करणेकरीता युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी बाजार समितीचे पदाधिकारी व सचिवांशी याबाबत चर्चा केली आहे.

             सध्या करोना आजारामुळे देशभरासह सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले  आहे यामध्ये बळीराजा अडचणीत सापडला आहे. एकीकडे चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने कांद्याची लागण करुन पिकं हाताशी आले आणि दुसरीकडे करोनामुळे संचारबंदी लागू असल्याने जवळपास सर्वच बाजार समित्या बंद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शेतात कांदे काडून पडले आहेत पण बाजार समितीत कांदा मार्केट बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणूक करणेसाठी चाळी नाहीत काहींची आर्थिक अडचण आश्या अनेक संकटात शेतकरी सापडला आहे त्यामुळे श्रीरामपुरात कांदा मार्केट सुरु होणे अवश्यक असल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे.

            संचारबंदीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. एरव्ही दोन ते तीन दिवस चालणारे कांदा मार्केट आठवड्यात चार ते पाच दिवस चालू ठेवल्यास होणारी गर्दी कमी करता येईल आणि शेतकऱ्यांन बरोबरच कांदा व्यापारी आणि हातावर पोट असणारे हमाल व मापाडी यांना देखील दिलासा मिळणार आहे त्यामुळेच ससाणे यांनी बाजार समितीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.  आणि सदर कांदा मार्केट चालू करतांना सोशल डिस्टनसिंग, गर्दी टाळणे याबरोबरच त्याअनुषंगाने सगळ्या उपाययोजना बाजार समितीने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणेबाबत ससाणे यांनी कळविले आहे.

Rajesh Borude

1 Comments

  1. बाजार समितीने शेतकऱ्यांना व कर्मचारी आणि हमाल-मापाडी यांच्यासाठी कोणत्या सुविधा दिल्या त्यासंबंधी देखील एखादी बातमी प्रसिद्ध करावी....

    ReplyDelete
Previous Post Next Post