साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
श्रीरामपूर|विठ्ठल गोराणे |कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गावागावातील सीमाही बंद करण्यात आल्या आहे. परंतु, पालघरमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे दरोडेखोर समजून तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पालघरमध्ये तीन जणांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा देश हादरून गेला.चोर दरोडेखोर समजून जमावाने केलेल्या हल्ल्यात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज यांचा मृत्यू झाला आहे. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पालघर गडचींचले येथे झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन जनांपैकी त्रंबकेश्वरच्या हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्ष गिरी महाराज देखील ठार झाले.आहे आणि हे महाराज ज्या मंदिराची पुजा करत होते त्रंबकेश्वर मधील मोक्याच्या ठिकाणी ही मंदिराची जागा असून या जागेवरून वाद सुरू आहे आणि याच वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने या हत्याकांडाचा तीव्र निषेध करत घडलेल्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे ,शहराध्यक्ष- मंगेश छत वाणी ,जि अध्यक्ष -मनोहर बागुल, ता.अध्यक्ष-शिवाजी फोपसे,जि सरचिटणीस-वसंत गायकवाड,चिलिया तुवर,जगताप,अविनाश कंनगरे,राजेंद्र परध्ये, प्रसाद शिरसाट,राजेंद्र जाधव आदींनी निषेध करत चौकशीची मागणी केली.