साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
संगमनेर | येथील मानवता प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे विविध समाजउपयोगी कामे करत आहे. सध्या कोरोना विषाणुमुळे देशात लाॅकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरजूंना एक वेळचे जेवण मिळत नाही हे लक्षात घेऊन गेली २० दिवस मानवता प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील विविध गावांतील ग्रामीण गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे ५०० किट वाटप कसण्यात आले. सदर छोटेखानी कार्यक्रमाचा समारोप शोशल डिस्टन्सिंगचे पालन करत निमज येथे झाला.
सदर छोटेखानी कार्यक्रमास मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कासार, उपाध्यक्ष संदीप सातपुते, कार्याध्यक्ष सूर्यकांत गुंडाळ, सचिव भारत कुटे,विश्वस्त अनिल राहाणे, सोपानराव गुंजाळ आदी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विरभद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संपतराव डोंगरे होते.या आजारावर मात करण्यासाठी काय काळजी घ्यावी यावर अध्यक्ष विवेक कासार यांनी मार्गदर्शन केले.
मानवता प्रतिष्ठान मोफत आरोग्य तपासणी,नेत्ररोग तपासणी शिबिरे, तालुक्यातील शेकडो गोरगरिब विद्यार्थी यांना मदतीसाठी धावून येत असते.चार वर्षांपूर्वी सुमारे तीन लाख रूपरे पेक्षा अधिक किंमतीचे टॅन्कर्सद्वारे पाणीटंचाईत मोफत पाणी पुरवठा केला होता. वॄक्षारोपन वसंवर्धन, आध्यात्म संस्कार वृध्दी म्हणून आदीकमास अखंड हरिनाम सप्ताह, मोफत हिमोग्लोबीन तपासणी आदी उपक्रम राबवत आहे. सध्या मजूरांच्या हाताला काम नसल्याने मानवता प्रतिष्ठानने हा उपक्रम पार पाडला. निमज गावचे सरपंच गोरक्ष डोंगरे, ग्रा.पं.सदस्य विकास माने,अरूण गुंजाळ, सागर डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास कासार, बाळासाहेब कासार यांनी सोशल डिस्टन्सिंग साठी मदत केली.
मानवता प्रतिष्ठान उपक्रम यशस्वितेसाठी रामनाथ वाकचौरे, हरिश्चंद्र चकोर, तात्याराम कढणे, प्रकाश आरोटे, रवी ढेरंगे, जी.जी गायकवाड आदींसह प्रतिष्ठान शिलेदार यांनी बहुमोल सहकार्य केले. मानवता प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.