Ahmednagar : कॅन्टोमेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी ; लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन बंधनकारक


साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020

अहमदनगर | लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक करून कॅन्टोमेंट झोन वगळता  जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. ज्या अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यात, कृषी, आस्थापना, सामाजिक क्षेत्र, वन उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि पशू संवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयीसुविधा आदीसह विविध बाबींचा समावेश आहे.  


         अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबविणेकामी यापूर्वीच प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत केलेले आहेत.  त्याची कार्यवाही सुरू राहणार असून जिल्‍हयातील कन्टेन्मेन्ट झोन वगळता विविध उपक्रम व अतिरीक्‍त बाबींचा समावेश करण्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.



यात, जिल्‍हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅटोन्‍मेंट बोर्ड हद्दीमध्‍ये सर्व खाजगी वाहने व सर्व खाजगी प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाच्‍या वाहतुकीत ३० एप्रिलपर्यंत प्रतिबंध राहणार आहे.  

           कृषी विषयक सर्व कामे सुरु राहणार आहेत. यात तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील.ज्या ठिकाणी फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी,अधिकृत /नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. सदर लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध  करुन देण्याची जबाबदारी सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.आयुक्त,अहमदनगर शहर महानगरपालिका व मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/नगरपंचायत)यांनी  त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ना आवश्यक ते सहकार्य करावे. असे आदेशात नमूद केले आहे. याशिवाय, कृषी संबंधित उपकरणे/यंत्रे यांची  निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने,खते, किटकनाशके व बी-बीयाणे यांची दुकाने सुरु राहतील.पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्‍सम यांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतूकीची परवानगी असेल.शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्‍पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री करता येईल. 



           याशिवाय, सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम जसे, बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला विधवा यांची निवारागृहे, निवासगृहे सुरु राहतील.अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहेसुरु राहतील.
जेष्ठ नागरीक/विधवा/स्वातंत्र्य सैनिक/संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना यांच्या निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु राहतील.सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला बालके, महिला, स्तनदा माता यांचा पोषण आहार घरपोच देतील. कोणत्याही लाभार्थ्याला अंगणवाडीत बोलावले जाणार नाही.


        तसेच, मत्स्यव्यवसाय व त्या संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग  सुरु राहतील.मत्स्य बीज उत्पादन व खाद्य पुरवठा करणारे उद्योग सुरु राहतील.दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री,प्रक्रीया, वितरण करणारे, वाहतूक व पुरवठा करणा-या यंत्रणा सकाळी 5 ते 8 व सायं. 5.00 ते 7.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्मव पशूखाद्याशी संबंधित असलेले, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे सुरु राहतील. याशिवाय, पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत) ,कुरिअर सेवा देणा-या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व  इंटरनेट  सेवा सुरु राहतील.

       तसेच, अत्यावश्यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहनचालक व पाठीमागील सिटवर केवळ एक व्यक्ती आणि दुचाकी वाहनां करीता केवळ वाहन चालक यांनाच परवानगी राहील.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post