![]() |
श्रीरामपूर : ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक डॉ दिपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. (छाया : भरत थोरात) |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वांरनटाइन असलेल्या व्यक्तींची वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याचे कारणावरून महिला पुरुषांच्या जमावाने पत्रकार नवगिरे यांच्या घरावर व कुटुंबीयावर हल्ला करून श्री. नवगिरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सध्या राज्यात कलम १४४ व १८८ जारी असताना शासकीय आदेशांचे उल्लंघन करून सदर व्यक्ती क्वारनटांइन मध्ये असताना नियम तोडून घरावर जमाव आणला हे नियमबाह्य आहे.त्या संबंधितावर सोनई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.तरी त्यांचेवर पत्रकार हल्ला कायद्यानुसार संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई करून पत्रकार नवगिरे व कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे. तसेच पत्रकार दिपक उंडे हे श्रीरामपूर शहरातील वार्तांकन करण्यासाठी जात असतांना श्रीरामपूर शहराचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांनी पत्रकार दिपक उंडे यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे, पत्रकार उंडे यांनी मी पत्रकार असल्याचे तसेच आयकार्ड दाखवुन सुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली आहे. सदर दोन्हीही घटना निषेधार्थ असुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेची गळचेपी करणाऱ्या आहेत. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपालीताई काळे यांनी स्वःत लक्ष घालून संबधितावर योग्य ती कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष संदिप जगताप , जिल्हा प्रासिध्दी प्रमुख राजेंद्र देसाई, इले.मिडियाचे युनुस इनामदार, जेष्ठ पत्रकार रावसाहेब साठे, तालुका संघटक भरत थोरात यांनी शासकीय आदेशाचे पालन करीत सोशल डीस्टन्स ठेवून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ दिपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ दिपाली काळे यांनी पत्रकारांना दिले.
कारवाई झालीच पाहिजे
ReplyDelete