Shrirampur : सरकारने स्वतंत्र फोटोग्राफर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ; श्रीरामपुर तालुका फोटोग्राफर असोसिएशनची उद्धव ठाकरेंकडे मागणी



साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
श्रीरामपूर | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे हे एक कलाकार म्हणजेच एक  उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर च्या वेदना भावना हे चांगल्याप्रकारे ते जाणतात महाराष्ट्रातील फोटोग्राफर महाराष्ट्रातील फोटोग्राफी व्यवसाय नवनवीन मोबाईल मुळे पूर्णपणे डबघाईला आला आहे कोरोना च्या लॉकडाऊन धोरणामुळे गेली दोन महिने लग्नसराई यात्रा-जत्रा शहर व ग्रामीण भागातील सर्व धर्मियांचे धार्मिक कार्यक्रम होऊ शकले नाही त्यामुळे अनेका वर उपासमारीची  वेळ आली सरकारने सर्व फोटोग्राफर्सना  दरमहा अर्थिक अनुदान द्यावे,  अशी मागणी मुख्यमंत्री श्री उद्धवजी  ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



       कॅमेरा फोटो साहित्याची दिवसेंदिवस होत असलेली वाढ व महागाई मुळे हा व्यवसाय करणे फार अवघड झाले आहे  वीज बिलाचे दारात होणारी वाढ अचानकपणे होणारे भारनियमन यामुळे हा व्यवसाय प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगती कडे लागला आहे सरकारची कोणतीही मदत या  व्यवसायाला नाही म्हणून या व्यवसायाकडे सरकारचे ही लक्ष नाही त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका ही कर्ज देण्यास टाळाटाळ करतात या व्यवसाय करिता सरकारने स्वतंत्र फोटोग्राफर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून मुबलक प्रमाणात व्याज आकारणी करून हा व्यवसाय म्हणून न पाहता व्यापार म्हणून पाहावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे महत्वाचे प्रसंगाचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर आपला जीव धोक्यात घालून हे काम करीत असतो त्याचा साधा विचार ही करण्यात येत नाही एखाद्या घटनेत फोटोग्राफर जखमी अथवा मृत्यू पावल्यास शासनाची कोणती आर्थिक मदत त्याच्या कुटुंबीयांना दिली जात नाही यामुळे फोटोग्राफर यांचे कुटुंब उघड्यावर पडते या सर्व विषयाचा विचार करून त्वरीत फोटोग्राफर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी आग्रही मागणी श्रीरामपुर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने  करण्यात आली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post