सर्वस्पर्शी,प्रबोधनात्मक व चित्तथरारक नृत्ये,प्रेक्षकांची गर्दी अन् बक्षिसांच्या वर्षावाने एक ऐतिहासिक वार्षिक स्नेहसंमेलन
श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी येथील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील शाळांना लाजवेल असे भव्य,आकर्षक व शिस्तबद्ध अशा वातावरणात उत्साहात संपन्न झाले.गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर,राजू इनामदार,सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसरपंच विजयसिंग परदेशी,माजी उपसभापती नितीन भागडे,इंजि.संतोष सगम,ज्येष्ठ नागरिक बापुराव आढाव,बाळासाहेब दुशिंग,मार्केट कमिटीचे संचालक किशोर कालंगडे,पोलिस अधिकारी ज्योती उंदरे,सेवानिवृत्त संशोधन अधिकारी देवराम तुपे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्षा सोनाली साबळे,महेंद्र साबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापुराव आढाव होते.अध्यक्षीय निवड सुधा गमे यांनी तर अनुमोदन प्रतिभा भिसे यांनी दिले.आभार मीना निकम यांनी मानले.अनिल ओहळ यांनी खुमासदार शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत राबवित असलेल्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती देऊन शाळा विकासासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शाळेत गावातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
माजी विद्यार्थी किशोर कालंगडे यांनी भव्य दिव्य कार्यक्रमाचे कौतुक करून शाळेस सर्वोत्परी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले.गुणवंत विद्यार्थ्यांना मधुकर कदम व सुधीर भागडे यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत,गणेश वंदना,छावा थीम,देशभक्तीपर गीत,शेतकरी आत्महत्या,लावणी,कोळी गीत,देवीचे गीत,खंडोबा गीत,साईबाबा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव,शाळा मराठी,पाणी हरवलं,फनी डान्स आदी गीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर व चित्तथरारक नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली अन् लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव उपस्थितांनी केला. निमगाव शाळेचे स्नेहसंमेलन हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता गुणवत्तेचा,संस्काराचा आणि ग्रामएकतेचा उत्सव ठरले.
शाळा विकासासाठी माजी विद्यार्थी संतोष सगम यांनी दिलेल्या सतरा हजार रुपयांच्या चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे यावेळी ह.भ.प.दत्तात्रय सगम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यांनी बालवाचनालयासाठी ५१ पुस्तके भेट दिली.माजी विद्यार्थी मार्केट कमिटीचे संचालक किशोर कालंगडे यांनी शाळा विकासासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.
रेकॉर्ड ब्रेक बक्षीस...
शाळेच्या इतिहासात पहिल्यादांच वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीसरूपाने *एक लाख सोळा हजार रुपये देणगी जमा झाली. आकर्षक विद्युत रोषणाई,फटाक्यांची आतिषबाजी,उत्कृष्ट साउंड सिस्टीम अन् चित्तथरारक नृत्ये अन् बक्षिसांच्या वर्षावाने आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने एक ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.
यावेळी माजी उपसरपंच भाऊसाहेब वारुळे,लहानू शेजूळ,राजेंद्र तांबे,माजी अध्यक्ष सुभाष झुराळे,संचालक आदिनाथ झुराळे,अमोल कालंगडे,सुधीर भागडे,रेवणनाथ झुराळे,मेजर बाळासाहेब भागडे,आप्पासाहेब काळे,वेणुनाथ कालंगडे,मधुकर कदम,सुभाष गायकवाड,दिलीप भागडे,भिमराज कोठुळे,गणेश भाकरे,चंद्रभान वाघ,किशोर चोरडिया,सुजित भागडे,प्रमोद शेजूळ,संतोष मासाळ,अरुण झुराळे,ग्रामपंचायत सदस्य संतोष बत्तीसे,भाऊसाहेब पंडित,पूजा कालंगडे,कोमल परदेशी,क्षितिजा परदेशी,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे,माजी मुख्याध्यापक अर्जुन बडोगे,अशोक पवार,सुनिता बडोगे,नलिनी पवार,शाळा व्यवस्थापन समिती आजी माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,सर्व अंगणवाडीसेविका,आशासेविका, निमगाव खैरी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सेवा सोसायटी सर्व संचालक,माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य,केंद्रातील व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,निमगाव खैरी,नायगाव व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,शिक्षिका प्रतिभा भिसे,मीना निकम,सुधा गमे,चंद्रशेखर गाढे,नंदा वाघमोडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्षा सोनाली साबळे,महेंद्र साबळे,सर्व सदस्य चंद्रकांत पवार,जयश्री भागडे,पूजा कालंगडे,अर्चना भागडे,अर्चना जिवरख,पूजा धुळगंड,राधाबाई निमसे,अनिता निमसे,सर्व विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
