साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | गणेशनगर फाटा ते दत्तनगर चौफुली रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. श्रीरामपूर व राहाता तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतीवीर सेना व आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.
छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ व रिपाई जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, गेल्या 10 वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी अनेक लोकांना प्राण गमवावे लागले तर काहिंचे अपघात होऊन अधू झाले आहेत. श्रीरामपुर व राहाता तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे म्हणून या रोडचे लवकरात लवकर काम करावे. सध्या स्थितीत पावसाळा असल्याचे कारण अधिकारी देत असले तरी त्यात तस्थ नाही. गेली दहा वर्ष या रोडचे कामच झाले नाही. सर्व सामान्य जनतेचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांनी या रोडचे कागदोपत्री कामे दाखवून पैसे खाण्याचे काम केले म्हणून या रोडची दुर्दशा आहे. राजकीय नेत्यांना निवडणूक आल्यावरच हा परीसर दिसतो. हा रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा, छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ व रिपाई जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे, छावा क्रांतीवीर सेनेचे छावा क्रांतीवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख विलास पाटणी, मुन्ना चव्हाण, दिपक कदम, शाहिर बनसोडे, बाबासाहेब थोरात, लांडे पाटील आदींनी दिला आहे.