मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवींची भव्य काव्य मैफिल

साईकिरण टाइम्स | ५ फेब्रुवारी २०२१

श्रीरामपूर | महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रीत कवींची भव्य काव्य मैफिल रविवारी (दि.७) मुख्य रस्त्यावरील आझाद मैदान, श्रीरामपूर येथे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे .

             यासाठी श्रीरामपूरचे आमदार व कवी लहू कानडे, साहि‍त्य परिषद शाखा श्रीरामपूरचे अध्यक्ष अविनाश काका आपटे, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, प्रमुख कार्यवाह श्री. बाबुराव उपाध्ये सर यांनी पुढाकार घेतला आहे. या कवी संमेलनासाठी जेष्ठ व वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे (पुणे), हास्य कवी अशोक नायगांवकर (मुंबइ), कृषीकवी प्रकाश होळकर (नाशिक), साहेबराव ठाणगे (पारनेर), भरत दौंडकर (शिरुर), तुकाराम धांडे (इगतपुरी), नारायण पुरी (नांदेड), प्रा. प्रशांत मोरे (कल्याण), संजीवनी तडेगावकर (जालना) व प्रा. डॉ. सुरेश शिंदे (करमाळा) अशा नामवंत निमंत्रीत कवींच्या मैफलीचा सर्वांनी आपल्या मित्रांसह सहपरिवार उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन आमदार लहू कानडे व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर यांनी केले आहे.

            या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी नुकतीच आमदार कानडे यांच्या यशोधन कार्यालयामध्ये बैठक झाली  या बैठकीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष अविनाश काका आपटे, प्रकाश कुलथे, श्रीरामपूर मेडिकल असो. च्या डॉ. बत्रा, डॉ. गल्हे सर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इंद्रनाथ पा. थोरात, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाइक, प्रा. प्रताप देवरे सर व सर्व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीरामपूर ही सांस्कृतिक भुमी आहे. तिचे सांस्कृतिक वैभव मिरवणे आपले कर्तव्य एवढ्यासाठी रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी आझाद मैदान, मेनरोड, श्रीरामपूर येथे महाराष्ट्रातील नामवंत कवींची हास्य कवी मैफल सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केली आहे. सदर काव्य मैफिलीचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार लहू कानडे व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post