प्रभाग २ मध्ये 'आधार कार्ड नोंदणी कॅम्प', नगरसेविका सौ प्रणिती चव्हाण यांचा पुढाकार : नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन



श्रीरामपूर : श्रीरामपुर तालुक्याचे माजी आमदर स्व जयंतराव ससाणे यांच्या स्मृतिदिना निमित्त श्रीरामपूर डाक कार्यालयामार्फत शासकीय आधार कार्ड नोंदणी कॅम्प नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २ मधील रामजदेवजी बाबा समाज मंदिर, गोंधवणी रोड येथे दि. १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या मागणीनुसार शिधापत्रिका धान्य वितरण प्रणाली मध्ये आधार कार्ड अपडेट नसल्याने बहुतांश रोजंदारी कामगार, नागरिक यांना स्वस्त धान्य दुकानांद्वारे महाराष्ट्र शासनाच्या अन्नधान्य वितरण व्यवस्थेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे बरेचसे कुटुंब वंचित राहत आहेत. प्रभागातील पाच ते सहा अंगणवाडी मधील लहान मुले, स्तनदा माता यांना एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत पोषण आहार मिळणे अवघड झाले आहे. गोंधवणी रोड पंचक्रोशीतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात ईकेवायसी करीता मोठ्या प्रमाणात आधार, पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे हप्ता जमा झालेला नसल्याने महिला वर्ग या योजनेपासून वंचित होवू नये तसेच भागातील जेष्ठ नागरिक यांच्या विविध शासकीय योजनांच्या थकीत अनुदान, डोल कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी श्रीरामपूर डाक विभाग यांच्या मोठ्या सहकार्याने सदरिल शासकीय आधार कार्ड कॅम्प बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी पर्यंत श्री रामदेवजी बाबा समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post