पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्त्य वाटप



श्रीरामपूर : सेवानिवृत्त शिक्षक नवनाथ अकोलकर यांनी त्यांच्या आई स्व.रंगुबाई अकोलकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरानार्थ नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथील विद्यार्थ्यांना १ जानेवारी रोजी शैक्षणिक साहित्त्य व खाऊचे वाटप केले.

          यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, शिक्षक राजू गायकवाड, प्राची लोळगे, सचिन डोखे, पल्लवी बोरुडे उपस्थित होते.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post