श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील यांचे मनसे कार्यालय येथे नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा सचिव संजय नवथर, मनसे तालुका अध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहर अध्यक्ष सतिश कुदळे या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इथून असणाऱ्या उमेदवारांची मते जाणून घेऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकी मध्ये आपली तयारी स्वबळावर लढण्याची ठेवायची आहे.
स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाने युतीचा प्रस्ताव देऊन सन्मानपूर्वक जागा दिल्यास राज साहेब ठाकरे व इतर वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.परंतु, युती होऊ अगर ना होऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आपल्या पक्षाची ताकत दाखवण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तन मन जणांनी काम करावे व निवडणुकीचे जोरात तयारी करा असे आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीत प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा सचिव संजय नवथर, मनसे तालुका अध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहर अध्यक्ष सतिश कुदळे, भास्कर सरोदे तालुका सचिव, महेश सोनी शहर सचिव, विलास पाटणी तालुका संघटक, निलेश सोनवणे शहर संघटक, विठ्ठल ठोंबरे तालुका उपाध्यक्ष, मारूती शिंदे शहर उपाध्यक्ष, सोमनाथ पवार, संदीप विश्वंभर, प्रवीण कारले सचिन कदम,राजू जगताप, प्रसाद पऱ्हे, किशोर भागवत, दीपक सोनवणे, मच्छिंद्र हिंगमिरे, सुजित गायकवाड, संतोष धुमाळ, सुरज जोशी, अमोल वडीतके, बाळासाहेब ढाकणे, किरण वानखेडे, सुनील करपे, फिरोज सय्यद, सरताज सय्यद, सौरभ निर्मळ किशोर शिंदे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
