शिवसेना शिंदे गट व राष्ट्रीय श्रीराम संघाचा श्रीरामपुरात दीपावली फराळ कार्यक्रम ; सागर बेग यांच्यात धनुष्यबाण पेलण्याची ताकद, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची जोरदार चर्चा


 

श्रीरामपूर : शिवसेना शिंदे गट व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या संयुक्त विद्यमाने दीपावली फराळाचा कार्यक्रम श्रीरामपुरात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

शहरातील व तालुक्यातील शिंदे शिवसेना गटाचे शिवसैनिक तालुका प्रमुख, शहर प्रमुखांबरोबरच जिल्हा प्रमुख नितीन औताडे व राष्ट्रीय श्रीराम संघांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला स्नेह कार्यक्रमाचे स्वरूप आले होते.

राष्ट्रीय श्रीराम संघांचे खंदे समर्थक व शिरसगावचे युवा नेतृत्व रोहित यादव यांना शिंदे शिवसेनेच्या श्रीरामपूर तालुका युवा सेनेच्या अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते देण्यात आले. एक दिवस अगोदर या कार्यक्रमाचे झालेले नियोजन आणि दिलेल्या निरोपावर शहरातील व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

उत्तर नगर जिल्हा माजी प्रमुख राजेंद्र देवकर यानी धर्मरक्षक सागर बेग यांनीच नगराध्यक्षपदाची उमेदवारी करण्याचा शिंदे शिवसेनेची इच्छा असल्याचे मत व्यक्त करत जिल्ह्यात धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त सागर बेग यांच्यातच असल्याचे स्पष्ट विचार मांडले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख उत्तर नगर नितीन औताडे, माजी जिल्हा प्रमुख उत्तर नगर जिल्हा राजेंद्र देवकर. युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, जिल्हा प्रमुख (OBC VJNT) सौ.सारिकाताई राजेश वाव्हळ, शहर प्रमुख महिला आघाडी सौ. सुरेखाताई वाडिले, जिल्हा उप प्रमुख महिला आघाडी सौ.राजश्री होवाळ, तालुका प्रमुख संतोष डहाळे, तालुका प्रमुख प्रदीप वाघ, माजी तालुकाप्रमुख बापू शेरकर, विशाल शिरसाठ जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार, संजय बाहुले जिल्हा उपप्रमुख (OBC)  वजन्ट,शिवनाथ फोपसे उपतालुका प्रमुख विशाल दुर्गे, विठ्ठल गोराणे, सागर कुदळे, महादेव होवाळ, संदीप दातीर (युवासेना तालुका प्रमुख) लक्ष्मण पाचपिंड यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post